
ग्रामीन,शहरी व दगडखाण क्षेत्रातील महिलांचे सक्षमीकरणांवर गेली पंचवीस वर्षे भरीव रचणात्मक कार्य करणारे संतुलन संस्थेने ट्रस्ट फॉर रिटेलर्स रिटेलर्स असोसिएट ऑफ इंडिया अर्थात ट्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 28 या वयोगटातील महिला आणि मुलींसाठी रिटेलर मार्केटिंग हा मार्केटिंग क्षेत्रासाठी अत्यंत उपयोगी असा 45 दिवसाच्या कोर्स संतुलन भवन तुळजाभवानी नगर खराडी येथे सुरू केला आहे. आजची स्री सक्षम असून तिने स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभे राहावे यासाठी त्यांच्या विविध कुशलता विकसीत करून जास्तीत जास्त महिलांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संतुलन संस्थेने ट्रेन संस्थेच्या सहाय्याने पूर्ण तयारीने प्रशिक्षण सुरू केले आहे याचा लाभ जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार व अप्रशिक्षित महिलांनी घ्यावा असे आवाहन संतुलन संस्थेचे संचालिका पल्लवी रेगे यांनी केले. कोर्स नंतर महिला व मुली मार्केटिंग क्षेत्रामध्ये निश्चितच स्वतःच्या पायावर उभे राहून आपली चमक दाखवतील असा विश्वास ट्रेन च्या व्यवस्थापिका शिल्पा देहाड यांनी व्यक्त केला.
महिलांनी सर्व क्षेत्रात रोजगारांची संधी मिळवली पाहीजेत त्यांसाठी लागणारा कुशलता विकसीत करण्यासाठी संतुलन संस्था सतत प्रयत्नशील आहे याचा लाभ घेऊन प्रत्येक घरातील किमान एक महिलेला नोकरी मिळालाच पाहीजे असा ध्यास संतुलनच्या असल्याची आशा अॅड.बी.एम.रेगे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष वंदना भुजबळ यांनी तर सूत्रसंचालन आदिनाथ चांदने यांनी केले तर आभार निर्मला धुमाळ यांनी मानले.