नवरात्री – दिवाळी दरम्यान सर्वरोग आरोग्य – नेत्र तपासणी शिबिर संयोजनासाठी संपर्क साधण्याचे श्री पंत वालावलकर हॉस्पिटलचे आवाहन . कोल्हापूर – लवकरच नवरात्री उत्सव आणि दिवाळी दरम्यान आपल्या भागामध्ये आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर घेण्यासाठी तरुण मंडळे , तालीम संस्था – महिला बचत गट – दांडिया समुह यांनी थेट संपर्क साधावा असे आवाहन श्री पंत वालावलकर हॉस्पिटल ,शिवाजी उद्यम नगर यांच्यावतीने प्रमुख संचालक संतोष कुलकर्णी यांनी केले आहे . या शिबिरामधून डोळे तपासणी सह चष्मा चा नंबर ही काढून दिला जाणार आहे तसेच गरजेनुसार चाचणी व गरज पडल्यास मोतीबिंदू अथवा इतर डोळ्याचे ऑपरेशन हे सवलतीत केली जाणार आहे . यासह जनरल वैद्यकीय तपासणी मध्ये गरजेनुसार तीन ते दहा दिवसाची औषधे सहभागी नागरिकाना दिले जाणार असून आवश्यकतेनुसार इतर उपचार हेही श्री पंत वालावलकर हॉस्पिटल शिवाजी उद्यम नगर येथे केले जाणार आहे . तरी इच्छुक तरुण मंडळी महिला बचत गटांनी तालीम संस्था यांनी आपल्या संस्थेच्या लेटरहेड वर मागणी पत्रासह हॉस्पिटल मध्ये समन्वयक विरेंद्र वणकुद्रे – राजेंद्र मकोटे (9527434300/9762809762 ) यांच्याशी संपर्क साधावा श्री पंत वाल वालकर हॉस्पीटल प्रशासनाने कळविले आहे . या शिबीरा दरम्यान नेत्रदान प्रक्रिया संदर्भात तांत्रिक माहिती देऊन शासकीय – प्रशासकीय ऐच्छिक फार्म ही भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. . ई एस आय सी पेशन्ट व त्यांचे परिवारासाठी सपूर्णपणे मोफत ट्रीटमेंट उपलब्ध असणार आहे .
Posted inBlog
नवरात्री – दिवाळी दरम्यान सर्वरोग आरोग्य – नेत्र तपासणी शिबिर संयोजनासाठी संपर्क साधण्याचे श्री पंत वालावलकर हॉस्पिटलचे आवाहन .
