एक दिवसीय नि:शुल्क तांत्रिक अनिवासी उदयोजकता विकास प्रशिक्षण शिबिर
रजत डेकाटे //नागपूर जिल्हा प्रतिनिधी ✍️✍️
नागपूर:- महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्र (MCED) हिंगणा केंद्र नागपूर व्दारा आयोजित व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेव्दारा पुरस्कृत 6 महिने कालावधीचा नि:शुल्क तांत्रिक अनिवासी उदयोजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अनुसुचित प्रवर्गातील उच्च शिक्षित युवक – युवतीकरीता नि:शुल्क एक दिवसीय प्रेरणा शिबीराचे आयोजन सामाजिक न्याय भवन दिक्षाभूमी रोड, नागपूर येथे करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाकरीता १०५ युवक-युवतीनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला माल्यार्पण व संविधान उद्देशिकाचे वाचन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. बाबासाहेब आम्बेडकर कॉलेज नागपुर इंन्कुबेशन व बी.बी.ए. अभ्यासक्रमाचे तदन्य प्रा. श्री. सुशील गाड़ेकर यांनी युवक युवातींना इंडस्ट्रिज ४.० वर आधारीत इंन्कुबेशन फॉर न्यु जनरेशन इंन्टरप्रेनर स्टार्ट-अपस या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने मा.श्री. रत्नदीप कांबळे, उद्योजक तथा अध्यक्ष बुद्धिस्ट इंटरपैनल असोसिएशन नागपुर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, बार्टी व एमसीईडी च्या माध्यमातून नव उद्योजक घडविन्याचा हा प्रशिक्षण कार्यक्रम फार चांगला असून या मध्ये जास्तीत जास्त युवक-युवतीनी सहभागी होउन स्वत:चे भविष्य घडवावे. नव उद्योजकांसाठी ही मोल्यवान संधी आहे त्याचे सोने करावे. त्याच प्रमाणे इंफोमेट्रिक चे डारेक्टर मा. नितिन आवळे व सुजाता आवळे यांनी सुद्धा इंन्कुबेशन फॉर न्यु जनरेशन इंन्टरप्रेनर स्टार्ट-अपस या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्टी चे जिल्हा प्रकल्प अधिकारी हुदय गोडबोले यांनी बार्टी उपक्रमाबाबत युवक युवातींना माहिती देवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतुन मा. हेमंत वाघमारे केंद्र प्रमुख/प्रकल्प अधिकारी /राज्य समन्वयक बार्टी यांनी इंडस्ट्रिज ४.० वर आधारीत इंन्कुबेशन फॉर न्यु जनरेशन इंन्टरप्रेनर स्टार्ट-अपस या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत व एमसीईडी प्रशिक्षण उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विशेष उपस्थित मा. शीतल गडलिंग प्रकल्प अधिकारी बार्टी नागपूर यांनी स्थान भूषविले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता एमसीईडी समन्यवक विपीन लाडे, रोशन मानकर, के. टाकळे, नीलिमा उके, संध्या चाम्भारे, रोशनी नंदेश्वर,तथा बार्टी समतादूत सतीश सोमकुंवर, शुभांगी टिंगणे, शारदा माकोडे, दीक्षा पवार, दुर्योधन बगमारे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हिंगणा तालुका समतादूत श्री. सतीश सोमकुंवर यांनी केले तर सर्व पाहुण्यांचे आभार एमसीईडी हिंगणा समन्यवक सौ. नीलिमा उके यांना मानले.