अखिल झाडीपट्टी नाट्य विकास मंडळाच्या वतीने ब्रम्हपुरी येथे ४ थे झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रजत डेकाटे // नागपूर जिल्हा प्रतिनिधी ✍️🏵️
झाडीपट्टी नाटकात काम करणाऱ्या अनेक कलावंतांनी अगदी बालणापासून नाटकांचा छंद जोपासून या कलेसाठी आपले जीवन समर्पित केले आहे. नाटकांवर प्रेम करणाऱ्या अनेक कलाकारांनी झाडीपट्टी नाट्य विकासासाठी दिलेल्या योगदानामुळेच आज १५० वर्षांनंतरही हा कलाप्रकार जिवंत आहे.
खरंतर नाटकाच्या माध्यमातून सामाजिक नाती जपली जातात. हसणे, रडणे, गंभीर होणे अशे अनेक भाव नाटकातून कलाकार रसिकांसमोर सादर करतात. ज्या कलाकाराची नाळ माणुसकी सोबत घट्ट जोडलेली आहे तोच कलाकार नाट्य कलेला योग्य न्याय देऊ शकतो. त्यामुळेच की काय कलाकार कधी निवृत्त होत नाही. तो आजीवन आपल्या कलेच्या माध्यमातून स्वतःला जोडून ठेवतो आणि हीच त्याच्या आयुष्याची खरी कमाई असते.
झाडीपट्टी भाषेला आणखी लोकप्रियता मिळावी, या नाट्य कलेचा प्रचार प्रसार देशभ व्हावा यासाठी अधिक उत्तम दर्जाची नाटकं तयार करता यावी यासाठी सर्व कलाकारांना माझ्या शुभेच्छा देतो.
आजच्या स्पर्धात्मक युगात माझ्या झाडीपट्टी भागातील कलावंत मागे राहू नये यासाठी एक भव्य नाट्य अकादमी या कलाकारांना उपलब्ध करून देता यावी हे माझं ध्येय आहे. विदर्भाची ओळख म्हणून नावारुपाला येईल अश्या नाट्य अकादमीकरीता आवश्यक २५ कोटी रुपयांचा निधी यावर्षीच मंजूर करून द्यावा यासाठी मा. मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे.
चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग म्हणजे झाडीपट्टी. या भागात गेल्या १५० वर्षांपासून लोककलावंत नाटक हा कलाप्रकार सादर करत आहेत. दिवाळीनंतर शेतातील पीक हाती आले की इथल्या नाटकांना प्रारंभ होतो. विदर्भात शहरीकरणाचे वारे वाहू लागले असले तरी इथल्या नाट्यसंस्कृतीने आपली प्राचीन परंपरा जपली आहे. वैदर्भीय शेतकऱ्याचे नाटकावर फार प्रेम आहे. बऱ्याच कालावधीनंतर संमेलन होत असल्याने झाडीपट्टी नाट्य संमेलनामुळे रसिकांमध्ये एक वेगळं चैतन्य मला आज पाहायला मिळालं आहे. या संमेलनामुळे देशात झाडीपट्टीची आणखी एक वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होईल ही खात्री आहे.
झाडीपट्टी नाट्य संमेलन मुख्य समितीचे सदस्य अनिरुद्ध वनकर, हिरालाल सहारे (पेंटर), अनिल उट्टलवार , परमानंद गहाणे, प्रल्हाद मेश्राम, शेखर पटले, प्रा. शेखर डोंगरे, भास्कर पिंपळे, मुस्ताक शेख, किरपाल सयाम, नित्यानंद बुद्धे, अंबादास कांबळी, संदीप राऊत,सचिन कवासे, युवराज प्रधान, सपना मोटघरे, संजय रामटेके व नाट्य संमेलनाला प्रत्यक्षात आणण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व सदस्यांचे नक्कीच कौतुक केले पाहिजे असा आजचा सोहळा होता.