मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय स्मारकाच्या निधीसाठी निवेदन
विरयोध्दा गोविंद गोपाल गायकवाड यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा आराखडा तयार. पंडितभाऊ दाभाडे
पुणे दि. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर सन्मानपूर्वक वढू बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करणारे आणि त्यांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे सेवक व नाशिक येथील रामशेज किल्ल्याचे किल्लेदार वढू बुद्रुक जिल्हा पुणे येथील वीर योद्धा गोविंद गोपाल गायकवाड यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी निधी मिळावा या मागणीसाठी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी मंत्रालय मुंबई येथे जाऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार खासदार सुप्रियाताई सुळे खासदार डॉ अमोल कोल्हे आमदार अशोक पवार यांना निवेदन दिले असे बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी सांगितले
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि वीर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या पराक्रमाची व शौर्याची प्रेरणा देणारा इतिहास महाराष्ट्र राज्य सह देशातील सर्वच घटकांच्या नागरिकांना व नव्या पिढीला माहिती व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी वीर योद्धा गोविंद गोपाल गायकवाड यांचे १४ वे वंशज असलेले उद्योजक युवराज जयेश राजेंद्र गायकवाड श्रीमती राजमाता अहिल्या ताई गायकवाड सुरेश गायकवाड रमेश गायकवाड पांडुरंग गायकवाड कैलास गायकवाड वढू बुद्रुक गावातील नागरिकांशी भेट घेऊन त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून वीर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा आराखडा तयार केला असल्याची माहिती ही बहुजन जनता दर संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिली असून वढू बुद्रुक येथे लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत वीर योद्धा गोविंदा गायकवाड यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून राष्ट्रीय स्मारक च्या बांधकामाला प्रारंभ करणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार खासदार सुप्रियाताई सुळे खासदार डॉ अमोल कोल्हे आमदार अशोक पवार या सर्वांना दिलेल्या निवेदनात म्हटले असून वीर योद्धा गोविंदा गायकवाड यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे