उल्टा चोर कोतवाल को डाॅटे
✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो. ,९७६२६३६६६२
काॅवल अच्छा, झिल अच्छा या काहान्या अच्छा हैं ?
बाबा तेरी फडफडाती आँखो के लिए नाम कौसा अच्छा है ?
भगवे उपरने परिधान करून जागतिक भांडवलदार बनण्याची स्वप्ने पाहणारा रामदेब बाबा. याच नाव जर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी बसलेल्या लोकात घेतलं तर लोक त्यांला कान्ह्या, दलाल, भडवा, बनावट उत्पादने विकणारा लुटारू, चंदनचोर असे अनेक नावे देऊन फिदीफिदी हसतात. हाच कान्ह्या नावाचा भांडवलदार उर्फ हिंदुत्वादी अंधभक्तांचा रामदेवबाबा २०१४ पुर्वी मोदी सत्तेत आल्यास पेट्रोल डिझेलचे भाव ३० ते ३५ रूपये असतील असे प्रसारमाध्यमांसमोर आभाळ हेपलत होता. लोकही आरएसएसच्या माईंच्या कारभारला वैतागल्यामुळे त्यांनी भाजप या काॅग्रेसच्या नातवाला एकहाती सत्ता दिली ? मग तेव्हापासून जी या देशाला अधोगती लागली ती आजपर्यंत चालूच आहे ? कारण दररोज चढत्या वेगाने वाढणारे पेट्रोल डिझेलचे दर, दोन कोटी तरुणांना नौकरी देण्याचे दाखवलेले गाजर, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाचे थाटामाटात केलेले भुमीपूजन हे सर्व एक दिखावा होता ? कारण आज घडीला पेट्रोल डिझेलने शंभरी पार केली तरी तो चंदन तस्कर रामदेबाबा काहीच का बोलत नाही ? तेव्हा प्रश्न पडतो की, हा स्वस्तातील पेट्रोल डिझेल स्वप्न दाखवणारा दरोडेखोर ? रामदेब बाबा काय सज्जनगडावर रामदासांच्या लंगोट्या पिळत बसला का ? त्यामुळे प्रश्न पडतो की, उद्या जर बहुजन समाजाला हा चोरटा फेकू जिथे कुठे दिसला आणि त्याला जर आमच्या तरुणांनी गावठी रुमण्याचा दणका देवून त्याचा मणका मोकळा केला तर त्या तरुणांचा काय दोष आहे ? रामदेवच्या कंपनीने उत्पादीत केलेल्या अनेक उत्पादनाची प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्यातली अनेक उत्पादने निकृष्ठ दर्जाची आहेत असे प्रसारमाध्यांनी त्या त्या वेळी सांगितले व दाखवले आहे. परंतू आजकाल बाबा म्हणतो की, हे साफ खोटं असून माझ्या कंपनीची बदनामी सुरू आहे. जे लोक असे करत आहेत त्यांना मी सोडणार नाही.’ हा कानदेव एकदा पेरियार रामसामी यांच्याबद्दल अपशब्द उद्गारला होता म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
पेरीयार जाणून घ्यायला
तीन डोळ्यांची माणसं लागतात
दीड डोळ्याच्या माणसाची
नसते येवढी औकात.
रामदेव हा हरियाणातील सैद अलिपुरचा त्याला एकदा चोरीच्या शंकेवरून त्यांच्या वडीलांनी त्याला चोप दिला होता. त्यांनतर त्याने घर सोडून गुरुकुल गाठलं. काही दिवसानंतर तिथेही त्यांने भांडण केले. त्यानंतर ज्याला २०१४ मध्ये सीबीआयने २००५ साली खोटी कागदपत्रे दाखवून पासपोर्ट मिळवला म्हणून गुन्हा दाखल केला होता. त्या बाळकृष्णने कंखाल येथिल शंकर देव करमवीर यांच्याकडे रामदेवची शिफारस केली. तेव्हा तिथे त्याला ‘ब्रम्हचर्य पालन आणि नि:शुल्क सेवा’ देण्याची शपथ घ्यावी लागली. योगी भांडवलदार या पुस्तकाच्या लेखिका म्हणतात की, दिव्य फार्मसी मध्ये डाॅक्टर मोफत तपासणी करायचे पण त्यांना औषधे १५०० रुपयांच्यावर लिहून द्यायची, त्यामुळे पोत्यानं पैसा जमा होत होता. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
पेट्रोल महागा झाले म्हणून
मागे रामदेवाने मारली बोंब
आता वीक आयड्राॅप मधून
झाला रूपायाला थेंब…
शंकर देव या रामदेवच्या गुरूला मणक्याचा व टीबीचा आजार होता. तसाच आजार रामदेव ला गुडघ्याचा होता, ह्याचे आजार हे दूर करू शकले नाहीत ते आम्हा बहुजनांचे काय आजार दुर करणार आहेत ? दिल्लीत पोलिसांच्या भितीने एका महीलेची पांढरी साडी परिधान करून पृष्ठभागाला पाय लावून पळणारा रामदास वृत्तीचा भागुबाई रामदेव बाबा काल परवा दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत म्हणतो की, पतंजलीच्या बदनामीसाठी काही लोकांकडून षडयंत्र रचले जात आहे. लोक पतंजली आणि मला संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, अशा लोकांना मी सोडणार नाही. म्हणून तर पतंजलीची बदनामी करणाऱ्या जवळपास ९० लोकांना कायदेशीर नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. (एबीपी माझा १६ सप्टें. २०२२) पतंजलीची बदनामी होतेय असा आव आणणारा रामदेव बाबा हा नकली वस्तू व नकली कारनामे करण्यात पटाईत आहे. याचे उत्तम उदाहरण ‘गाॅडमन टू टायकून द अनटोल्ड स्टोरी आँफ बाबा रामदेव’ या पुस्तकात लिहिलं आहे की, योगा करण्याच्या आधी व नंतर रामदेवची माणसं वजन काट्यात फेरफार करून शिबिरार्थीला वजन कमी झाल्याचा भास करवून घेत. रामदेव मग त्या व्यक्तीला बोलायला सांगत. कॅमे-यासमोर ती व्यक्ती मोठ्या उत्साहात योगा मुळे फायदा झाल्याचं सांगे. मग ती व्यक्ती निघून गेल्यावर रामदेव बाबा आणि त्याची माणसं त्या व्यक्तीच्या मुर्खपणावर फिदीफिदी हसत. हे रामदेवचे वर्तन म्हणजे उल्टा चोर कोतवाल को दाटे ? असं आहे. पतंजली विरोधात षडयंत्र रचल्या जात आहे अशी आरोळी ठोकणा-या बाबाला केवळ ‘गाॅडमन टू टायकून द अनटोल्ड स्टोरी आॅफ बाबा रामदेव’ ही छोटीशी पुस्तका पार नागडं करते. त्यामुळे आमच्या बहुजन समाजातील तरुणांनी ते एकदा वाचलं पाहीजे. पण हे पुस्तक लोकांपर्यंत पोहोचू नये याचा पक्का बंदोबस्त रामदेवच्या भक्तांनी केला आहे.
२००० मध्ये आस्था चॅनलचे मालक किरीट मेहता यांनी रामदेवाचा तो पोटाचे स्नायू गरं गरं फिरवणारी नौलीक्रिया शूट करून घबाड गवसल्याचा आनंदात मुंबईत आपल्या चॅनलकडे तो व्हिडिओ नेला परंतू आस्थाच्या सीईओ ना हा योगा प्रकार रुचला नाही, त्यामुळे त्यांनी प्रक्षेपणास नकार दिला. तेव्हा रामदेवच्या डोक्यात चॅनलची आयडीया घुसली. त्यामुळे रामदेवने संस्कार या चॅनलचा केवळ २० मिनिटांचा वेळ एक लाख पन्नास हजार रूपयांना विकत घेतला. ते प्रक्षेपण एवढं हिट झालं की, रामदेवने देणगीची मागणी करताच दोघांनी तात्काळ पाच लाख रुपये दिले. रामदेवच्या आश्रमात काम करणारे विपीन प्रधान हे योगी भांडवलदार पुस्तकाच्या लेखिकेला सांगतात की, एका रात्रीत आम्ही २२ लाख रुपये मोजले. मे २००४ मध्ये आम्ही पैसे मोजायला नकार दिला तेव्हा त्यांनी पैसे मोजण्याचे मशीन आणले.’ …. नंतर त्याचं रामदेवने प्रमोद जोशीच्या मदतीने मेहतांचा विश्वास घात करून त्याने त्यांचा १३ नोव्हेंबर २००९ रोजी राजीनामा घेतला. हा किस्सा मेहतांनी योगी भांडवलदार या पुस्तकाच्या लेखिकेला सांगताना अक्षरशः ते रडत होते.
बाबा रामदेव म्हणतो की, अनेक लोकांना पतंजलीची प्रगती सहन होत नाही. त्यामुळे पतंजलीला बदनाम करण्यासाठी पतंजलीच्या उत्पादनांमध्ये भेसळ करण्यात येत असल्याचे खोटे आरोप केले जात आहेत. परंतु, हे सर्व आरोप पूर्ण पणे खोटे आहेत. (एबीपी माझा १६ सप्टें. २०२२) ज्याला रामदेव बाबा पतंजली कंपनीची प्रगती म्हणतोय ती प्रगती नसून सामान्य लोकांची लुट आहे. कारण आज शेतकऱ्यांच्या दूधाला केवळ ४० रुपये लिटर दर आहे मात्र रामदेव बाबा कोणाचं गोमुत्र धरून विकतो काय माहीत ? पण त्यांच्या बाटलीबंद मुताचा आजचा दर १६४ रुपये लिटर आहे ही लुट नाही तर काय आहे ? पतंजलीची अनेक उत्पादने तपासणीध्ये निकृष्ट दर्जाची आहेत हे सिध्द झाल्यांचे रिपोर्ट इंडियन एक्सप्रेस सह अनेक वृत्तवाहिन्यांनी वेळोवेळी जाहीर केलेली आहेत. ७ डिसेंबर २०१५ रोजी हरियाणाच्या निर्वाना गावचे विनोद कुमार यांनी विकत घेतलेल्या पतंजली नूडल्स पाकिटात जिवंत आणि मेलेल्या अळ्या निघाल्या होत्या. तसेच २४ एप्रिल २०१७ च्या वृत्तपत्राने बातमी प्रसारित केली त्यात लिहिले होते की, भारतीय सैनिकांच्या कॅन्टीन मध्ये पतंजलीच्या आमला ज्यूस विकायला बंदी घातली.
आमच्या कोणत्याही उत्पादनात भेसळ नाही. परंतु, स्पर्धेक कंपन्यांकडून बदनामी करण्यासाठी खोटा प्रचार केला जातोय. मी काही दहशतवादी नाही. पतंजली खाद्य तेलाचे काही नमुने अधिकृत लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. गाझियाबादमधील एका लॅबने आम्ही पाठवलेल्या नमुन्याची तपासणी करून या पेक्षा शुद्ध तेल इतर कोणत्याच कंपनीचं नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लोक आता स्वत:च समजून जातील की पतंजलीला बदनाम करण्यासाठी कसे षडयंत्र रचले जात आहे असं रामदेव बाबा म्हणाले. (एबीपी माझा १६ सप्टें. २०२२) उत्पादनामध्ये भेसळ नाही म्हणणा-या बाबाला विचारावं वाटत की, दिव्य फार्मसीच्या उत्पादनात मानवी कवट्या, काळवीटाची शिंगे व रानमांजराचे विर्योत्पादक अंड घातल्या जाते असा आरोप केल्यानंतर ह्या उत्पादनाची आयुष मंत्रालयाकडून तपासची केली असता डिसेंबर २००५ मध्ये आलेल्या अहवालात औषधामध्ये मानवी डीएनए असल्याचे नमुद कसे झाले ? त्यामुळे मी काही दहशतवादी नाही. म्हणणारा बाबा रामदेव हा दरोडेखारापेक्षा कुठे कमी आहे ? यामुळे रामदेवचा काळा गोरखधंदा लोक जेव्हा स्वत:च समजून घेतील तेव्हा बाबाचा फडफडणारा डावा डोळा फोडल्याशिवाय राहणार नाहीत येवढे मात्र नक्की. कारण प्रियंका पाठक यांनी दी वायर या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘गाॅडमन टू टायकून द अनटोल्ड स्टोरी आँफ बाबा रामदेव’ या पुस्तकाच्या प्रती बाजारात विक्रीसाठी ठेवल्या की आपोआप गायब व्हायला लागल्या आहेत.’ म्हणून तर शेवटी विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
आसाराम रामदास रामदेव
यांचा मसावी राम निघतो
कोण कोठे कोण कसा
खेळ करून जगतो…….