अमिधारास इव्हेंट व भागीरथी महिला संस्थेमार्फत लघु आणि नव उद्योजकांसाठी शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन*
इचलकरंजी, प्रतिनिधी – शहरातील महिलांच्या उत्पादनास वाव मिळावा व बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता अमिधरास इव्हेंट्स व भागीरथी महिला संस्था इचलकरंजी यांच्यामार्फत महावीर भवन, इचलकरंजी येथे भव्य प्रदर्शन आणि विक्री तसेच फूड फेस्टिव्हल सोहळाआयोजित करण्यात आला आहे.१ व २ ऑक्टोबर २०२२ रोजी महावीर भवन,बँक ऑफ बदोडा जवळ सकाळी ११ ते ८ या वेळेत सदर शॉपिंग फेस्टिव्हल असणार आहे.
यातून गृहउद्योगास चालना देण्यात येणार आहेत,प्रदर्शन नफा ना तोटा तत्वावर असून अगदी माफक दरात दोन दिवसासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लवकरात लवकर संधीचा लाभ घेण्याचे आवाहन अमिधरास इव्हेंटच्या अध्यक्ष सौ अमृता भोसले यांनी केले असून अधिक माहिती साठी 9834670492,9850904462 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.