शाहू स्मारक भवनात ‘२ सिल्व्हर ओक ‘चा शुक्रवारी प्रकाशन सोहळा

शाहू स्मारक भवनात ‘२ सिल्व्हर ओक ‘चा शुक्रवारी प्रकाशन सोहळा

शाहू स्मारक भवनात ‘२ सिल्व्हर ओक ‘चा शुक्रवारी प्रकाशन सोहळा
विविध १०० व्यासंगी मान्यवरांनी घेतला जेष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा शब्द वेध
दुर्गा पब्लिकेशन हाऊसचे दत्ता पवार यांचे संपादन

कोल्हापूर-:राजकारणाबरोबरीने विविध सामाजिक पैलूंनी प्रदीर्घ काळ कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या ‘२ सिल्व्हर ओक ‘या पुस्तकाच्या ६ व्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी (ता. ३०) शाहू स्मारक भावांमध्ये हीनार आहे. नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या हस्ते व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यातील औधोगिक, शैक्षणिक,कला, क्रीडा, सांस्कृतिक,आरोग्य,माध्यम विश्वातील १०० व्यासंगी दिग्गज मान्यवरानी नेमकेपणे वेध घेतलेल्या जेष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा’विविध पैलूने नोंद घेतलेल्या या ७००पानी पुस्तकाचे संपादन दत्ता पवार यांनी केले आहे.मराठी साहित्य विश्वाने अत्यंत वेगाने आणि आपुलकीने वेध घेतलेल्या ‘२ सिल्व्हर ओक’ या पुस्तकाची अवघ्या एका महिन्यातच हि सहावी आवृत्ती प्रकाशित होत आहे. प्रकाशन सोहळ्यावेळी सवलतीत सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे.या पुस्तकात शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर,डॉ. अनिल काकोडकर,डॉ. विजय भाटकर,किरण मुजुमदार,सुशीलकुमार शिंदे,देवेंद्र फडणवीस, सरकारी वकील उज्वल निकम,राजाभाऊ लिमये,रामशेठ ठाकूर,शांतीलाल मुथा, उद्योगपती बाबा कल्याणी, अरुण फिरोदिया,विश्वास चितळे,इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, दै. सकाळचे प्रतापराव पवार- श्रीराम पवार,दै. लोकमतचे विजय दर्डा – वसंत भोसले,दिग्दर्शक जब्बार पटेल,क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी सह विविध दिगज्जांनी नेमकेपणे अक्षरवेध घेतला आहे.
दुर्गा पब्लिकेशन हाऊसच्या वतीने दुपारी चार वाजता होणाऱ्या कार्यक्रमास माजी मंत्री हसन मुश्रीफ,माजी मंत्री सतेज पाटील,आमदार पी. एन . पाटील,आमदार राजेश पाटील उपस्थित राहणार आहेत.यासह जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार,लोकप्रतिनिधी तसेच समाजातील विविध घटकातील मान्यवरांना या प्रकाशन सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. तरी सर्व कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावे असेआवाहन स्थानिक संयोजन समिती समन्वयक ए . वाय. पाटील , व्ही. बी. पाटील आणि माजी महापौर आर. के. पोवार यांनी केले आहे. यावेळी अनिल घाडगे ,राजू जमादार, जाहिदा मुजावर, पूजा साळुंखे ,शितल तिवडे , महेंद्र चव्हाण, निहाल कलावंत ,सुनील देसाई , राजीव जमादार ,प्रमोद माळकर आदि उपस्थित होते .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *