प्रतिनिधी – पुणे
यूएसए मधील ग्रेस लेडीज ग्लोबल संस्थेच्या राजदूत (Ambassador) पदी डॉ. रिता शेटीया यांची सलग पाचव्यांदा नियुक्ती
यूएसए मधील ग्रेस लेडीज ही आंतरराष्ट्रीय संस्था महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काम करते. या संस्थेने नुकतेच रिता इंडिया फाऊंडेशन, पुणेच्या संस्थपिका डॉ. रिता मदनलाल शेटीया यांना भारतातील महाराष्ट्रासाठी ग्रेस लेडीज संस्थेच्या राजदूत पदी नियुक्त केले आहे. सलग पाचव्यांदा त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
2022 मध्ये शेटीया यांची पहिल्यांदा नियुक्ती झाली . त्यांनी ग्रेस लेडीज या संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील पुणे येथे फेस्टिव्ह इव्हेंट, “वॉक ऑफ कॉन्फिडन्स”, मानद डॉक्टरेट, ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड तसेच ग्लोबल रायटर्स फोरम मध्ये विविध सामाजिक, आर्थिक आणि इतर विषयांवर लेखन केले आहे. त्यांनी पुण्यात कलमाडी शाळेत केलेला “वॉक ऑफ कॉन्फिडन्स” ची नोंद ” ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये करण्यात आली.
त्यांनी गेल्या चार वर्षात ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी चे कार्य महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे करून महिला सक्षमीकरण आणि व्यक्तिमत्व विकास कार्यावर भर देत याचा विस्तार वाढविला. यामुळेच या संस्थेच्या संस्थपिका डॉ. सोना पांडे यांनी त्यांना ” ग्लोबल लीडर” “ग्लोबल एक्सलंस अवॉर्ड”, ‘ ग्लोबल वूमन आयकॉन अवॉर्ड’ , “ग्लोबल रायटर पुरस्कार” आणि ” शी इज ग्लोबल ” पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्याच प्रमाणे “शी इज ग्लोबल” या ग्रेस लेडीजच्या पुस्तकात शेटीया यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला आहे.
संस्थापिका डॉ. सोना पांडे म्हणाल्या, मला विश्वास आहे की ग्रेस लेडीज चे कार्य डॉ. रिता महाराष्ट्र बरोबर भारतात ही नक्कीच पुढे नेतील आणि महिलाना ग्रेस लेडीज च्या अंतर्गत ग्लोबल स्तरावर एक नवीन ओळख निर्माण करून देतील.
ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली संस्था आहे, जी स्वयंरोजगार, नेतृत्व, नवोपक्रम आणि जागतिक मान्यतेसाठी गैर-शैक्षणिक, उत्कटतेने प्रेरित कौशल्यांना प्रोत्साहन देऊन आधुनिक शिक्षणाची पुनर्व्याख्या करण्यात अग्रेसर आहे. २००९ मध्ये सिंगापूर येथे स्थापन झालेल्या अग्रगण्य ‘ग्रेस लेडीज ऑर्गनायझेशन’मधून विकसित झालेली ही अकॅडमी, आज एक यूएसए-नोंदणीकृत बिझनेस कॉलेज म्हणून अभिमानाने कार्यरत आहे. ही संस्था व्यावहारिक, वैयक्तिकृत आणि उद्देश-केंद्रित शिक्षण अनुभवांद्वारे पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा दूर करते. केवळ पाच महिलांपासून सुरू झालेला आमचा प्रवास आता १५,००० हून अधिक सक्षम महिलांचा/व्यक्तींचा एक जागतिक समुदाय म्हणून झाला आहे.
डॉ. रिता शेटीया म्हणाल्या की, ग्रेस लेडीज ही संस्था ग्लोबल स्तरावर महिलाना प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यशाळा, ग्लोबल एक्सपोजर, महिलाना आत्मनिर्भर बनवणे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि महिलांना अंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म देण्याचे काम करते. त्यांच्या ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड या अंतर्गत ही महिलाना चांगली संधी मिळते. महिलांनी आणि तरुणींनी या संस्थेतील विविध कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
