भोर तालुक्यातील रांजे गावात महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी​शून्य बजेटमध्ये समाजप्रबोधनाचा आदर्श; अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात

भोर तालुक्यातील रांजे गावात महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी​शून्य बजेटमध्ये समाजप्रबोधनाचा आदर्श; अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात

भोर तालुक्यातील रांजे गावात महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी
​शून्य बजेटमध्ये समाजप्रबोधनाचा आदर्श; अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात

​रांजे (ता. भोर):
सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक रांजे गावामध्ये महापुरुषांची संयुक्त जयंती अत्यंत उत्साहात आणि माणुसकीच्या दर्शनाने साजरी करण्यात आली. रमाई महिला मंडळ व अधिराज प्रतिष्ठान, रांजे यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी कांचन आतिश कांबळे, शोभा कांबळे आणि माजी ग्रामपंचायत सदस्या बेबीताई कांबळे यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
​अन्यायाविरुद्ध आवाज उठवा: अक्षरा वाठोरे
​या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या व वक्त्या म्हणून बाल समाजसेविका तथा विद्यार्थी आंदोलक ‘भीमकन्या’ अक्षरा राजू वाठोरे उपस्थित होत्या. आपल्या रोखठोक व्याख्यानातून त्यांनी महापुरुषांच्या संघर्षमय जीवनाचा वारसा मांडला. “महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, केवळ उत्सव साजरे न करता आपल्या मुलांना महापुरुषांचे विचार शिकवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
​सामाजिक बांधिलकीतून शैक्षणिक मदत
​केवळ घोषणाबाजी न करता सामाजिक कार्याचा आदर्श या निमित्ताने घालवून देण्यात आला. जयंती साजरी करताना गावाने एकल पालक किंवा दोन्ही पालक नसलेल्या अनाथ मुलांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन अक्षरा वाठोरे यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत रांजे ग्रामस्थांच्या वतीने ‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणून ५,००० रुपये रोख आणि शैक्षणिक साहित्य मदत स्वरूपात देण्यात आले.
​रांजे गावातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येत एकीचे आणि माणुसकीचे दर्शन घडवत हा आगळावेगळा उपक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती आमोद कांबळे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. या उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *