आयटक कामगार संघटनेच्या वतीने सांगलीत निवारा भवन येथे कॉ कुमार शिराळकर यांना भावपूर्ण आदरांजली!

आयटक कामगार संघटनेच्या वतीने सांगलीत निवारा भवन येथे कॉ कुमार शिराळकर यांना भावपूर्ण आदरांजली!

आयटक कामगार संघटनेच्या वतीने सांगलीत निवारा भवन येथे कॉ कुमार शिराळकर यांना भावपूर्ण आदरांजली!
उच्चशिक्षित कॉ कुमार शिराळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य कष्टकरी, असंघटित कामगार, आदिवासी व मागासवर्गीय यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यतीत केले. हे सर्व करताना त्यांनी ‘उठ वेड्या तोड बेड्या’ सारखी अनेक पुस्तके लिहून महाराष्ट्रातील हजारो तरुणांना चळवळीमध्ये झोकुन देण्याची शिकवण दिली. तरुणांच्या बरोबरच झोपडीत राहण्या माणसाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी त्यांचे प्रचंड लढे उभे केले. इतकेच नव्हे तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते असून सुद्धा राज्यातील सर्वच सामाजिक राजकीय मानवी स्वतंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांनी भागीदारी करून मार्गदर्शन केले. कॉ कुमार शिराळकर हे मिरजेचे असल्यामुळे ते सांगली जिल्ह्यात सातत्याने यायचे.
त्यांनी सांगली शहरांमध्ये बेघरांच्या लढ्यांच्यासाठी मार्गदर्शन केले. असंघटित उद्योगातील कामगारांच्या चळवळीस मार्गदर्शन केले. त्यामुळे सांगली जिल्ह्यात सुद्धा त्यांचे कष्टकरी जनतेच्या लढ्यामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. असे सांगून कॉम्रेड शंकर पुजारी यांनी कॉ. कुमार शिराळकर यांना आयटक कामगार संघटनेच्या वतीने कॉ कुमार शिराळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली व्यक्त केली. कोल्हापूर नगरीचे कलावंत, चित्रकार व उद्योजक श्री अनिल सडोलीकर यांनी कॉ कुमार शिराळकर यांच्या बद्दल आठवणी सांगितल्या. त्यांनी सांगितले की धुळे नंदुरबार मधील श्रमिक संघटनेची चळवळ समजून सांगण्यासाठी ते कोल्हापूरला १९८० सालापासून प्रत्यय नाट्य ग्रुप यांना येऊन भेटायचे. त्यामुळे कोल्हापुरातील मध्यमवर्गीय तरुणांच्या मध्ये कम्युनिस्ट चळवळीबद्दल आदर निर्माण झाला.
या आदरांजली सभेमध्ये प्रा.शरयू बडवे,कॉ सुमन पुजारी, कॉ विशाल बडवे, कॉ सना मुल्ला, कॉ सारिका नायकवडी, कॉ माया जाविर, कॉ अदिती कुलकर्णी, कॉ रोहिणी खोत, कॉ सोनाली करिमानी, कॉ श्रुती नाईक, कॉ शुभांगी तोळे ,कॉ करण काळे व जहिद मोमीन इत्यादीनी कॉ कुमार शिराळकर यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *