गुरुवारी दि 6 रोजी मुडशिंगी श्री स्वामी नरेंद्र महाराज भक्तगणातर्फे दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन- 151 शेतकऱ्यांना मदत – प्रचवन – संत्सग
कोल्हापूर – जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्र जी महाराज भक्तगणांच्या वतीने कोल्हापुरात गुरुवारी 6 ऑक्टोबर रोजी मुडशिंगी येथील दौलतराव पाटील मैदानामध्ये विविध कार्यक्रम संपन्न केले जाणार आहेत . या मध्ये 151 शेतकऱ्यांनाऔषध फवारणी मशीनचे मोफत वितरण केले जाणार आहे ,या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रम बरोबरच पादुका दर्शन तसेच गुरु पूजन – प.पू . कनिफनाथ महाराज यांचे प्रवचन – उपासक दिशा – दर्शन पुष्पृष्टी आणि महाप्रसाद असे विविध कार्यक्रम ही दिवसभर संपन्न होणार आहेत . शेतकऱ्यांना मोफत साहित्य वाटपासाठी उद्योग समूहाचे आमदार विनय कोरे , भाजपा खासदार धनंजय महाडिक, यांच्यासह माजी मंत्री सतेज पाटील , आमदार रुतुराज पाटील , सत्यजित उर्फ नाना कदम आदी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेले आहे .या सर्व सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि विजयादशमी दसऱ्यानंतरचा पहिला दिवस हा आपला सत्संग वातावरणात घालून एक सकारात्मक ऊर्जा घ्यावी असे आवाहन स्थानिक कोल्हापूर जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. नरेंद्र महाराज भक्तीगाणं तर्फे सध्या 32 अद्यावत रुग्णवाहिका या महामार्गावर सज्जा असून कोल्हापूर सांगली परिसरात चार कार्यरत आहेत या विविध पैलूंनी सुरुवात केली सामाजिक कार्य यामध्येही भक्तगण आणि कार्यकर्त्यांना सहभागी होण्यासाठी या सत्संग मेळाव्यामध्ये नोंदणी केली जाणार आहे तरी या सर्वाचा लाभ घ्यावा आणि पण कोल्हापूर पंचकोशीतील भक्ताने सहभागी व्हावे असे आव्हाने कोल्हापूर जिल्हा सेवा समिती नरेंद्र महाराज सेवा समितीने केले आहे .