घरा घरात बुद्ध धम्माचा प्रसार करणे प्रत्येक तरुणाची जबादारी :-अमरकुमार आनंद तायडे

घरा घरात बुद्ध धम्माचा प्रसार करणे प्रत्येक तरुणाची जबादारी :-अमरकुमार आनंद तायडे

घरा घरात बुद्ध धम्माचा प्रसार करणे प्रत्येक तरुणाची जबादारी :-अमरकुमार आनंद तायडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सच्चे देशभक्त, देशप्रेमी आणि राष्ट्रावर निस्सीम निष्ठा असलेले थोर राष्ट्रनेते होते. त्यामुळे ‘आपल्या धर्मातरामुळे आपल्या देशाच्या ऐक्याला, एकात्मतेला धोका पोहोचू नये, भारतीय समाजात धर्मवेड्या दहशतवादी अतिरेक्यांच्या तावडीत सापडू नये, आपला दलित समाज आगीतून उठून फुफाट्यात पड़ नये. आपला भारत देश कोणाही परकीयांच्या गुलामगिरीत अडकू नये, तसेच स्वातंत्र्याचे विध्वंसक वा देशाचे दुश्मन म्हणून आपले नाव इतिहासात नोंद होवू नये याची खबरदारी बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली होती.त्या साऱ्या गोष्टीचा विचार करून बाबासाहेबांचा स्वतंत्र विवेक बुद्धीने भगवान बुद्धाचा विज्ञाननिष्ठ, विज्ञानवादी , अस्पृश्यांच्या उद्धाराचा, मानवी कल्याणाचा ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय ‘बौद्ध धर्म’ स्वीकारण्याचा निर्णय घेतला, आपण बौद्ध धम्मच का निवडला?’ त्या संदर्भात त्यांनी सांगितले. “बौद्ध धर्म हा भारतीय धर्म आहे, तो धम्म मानवी स्वातंत्र्य, समता, न्याय नीती, शांति, अहिंसा, प्रेम आणि बंधुत्व या मानवी मूल्यावर व विज्ञान निषठवर आधारलेला आहे. बुद्धीवादी आणि विवेकी आहे. बौद्ध धर्मात ईश्वरवाद, देववाद, कर्मवाद, कर्मकांड, व पुनर्जन्म नाहीं, आत्मा परमात्मा नाही, स्वर्ग नरक, पाप पुण्य, मोक्ष असल्या काल्पनिक व बनावट गोष्टी नाहीत) अंधश्रद्धा माही. या गोष्टींना बौद्ध धम्मात मुळीच स्थान नाही. बौद्ध धम्म विज्ञानाच्या शास्त्रीय कसोटीला उतरतो. बुद्धीला व तर्काला पटतो. इस्लाम, खिश्चन आणि शिख वा अन्य कोणताही धर्म बुद्धीला, तर्काला पटत नाही, शास्त्रीय कसोटीला उतरत नाहीत.सर्व कसोट्यांवर फक्त बौद्ध धर्म उतरतो. तो धम्म बुद्धीला पटतो म्हणूनच मी बौद्ध धम्माची निवड केलेली आहे. बौद्ध धम्माच्या स्वीकाराने आपल्या समाजाची सामाजिक, आर्थिक व मानसिक गुलामगिरी नष्ट होणार आहे त्यामुळेच दलितांच्या उद्धार होणार आहे. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही) शेवटी अस्पृश्यांच्या गुलामगिरी व हिंदुकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचार याकडे वळून ते म्हणाले
बंधुनो! तुम्हा अस्पृश्यांना धर्मच नाही. उच्चवर्णीय तुम्हाला हिंदु समजतात परंतु ते तुम्हाला शूद्र व अस्पृश्य मानतात. हिंदु लोक तुम्हाला आपले बंधु अथवा हिंदु मानीत नाहीत. म्हणुनच गेली हजारो वर्षे तुमच्या पूर्वजमाना पिढ्यानपिढया गावकुसाबाहेर ठेवलेले आहे. आज तुम्ही तरी कोठे राहाता? अस्पृश्य म्हणून गावाबाहेर च ना! तुम्ही उच्च वर्णीयांचे गुलाम आहात, ते तुमचे मालक आहेत. ते तुम्हाला जनावरापेक्षाही हीनतेची वागणूक देतात. हिंदु लोक अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू देत नाहीत, हाटेलात व देवळात जावूदेत नाहीत उच्चवर्णीयांना अस्पृश्यांच्या (तुमच्या) सावलीचा सुद्धा विटाळ होतो. बंधू भगिनींनो! देवाधर्माच्या नावावर अनेक जुलमी बंधने घालून उच्चवर्णीयांनी तुमच्यावर गेली हजारो वर्षे अन्याय अत्याचार केलेत आणि आजसुद्धा करताहेत. आजवर तुम्हाला धर्मच नव्हता. जो धर्म तुम्हाला माणसे समजत नाही, तुम्हाला न्यायाने वागत नाही,तुम्हाला आपले बांधव मानीत नाही,
तुम्हाला माणसासारखे वागू देत नाही. तुमचे हक्क तुम्हाला उपभोगू देत नाही. तुम्हाला आपले गुलाम म्हणून वागवितो, जो धर्म तुमच्यावर अन्याय, अत्याचार करतो तो धर्म तुम्हाला काय कामाचा? तशा धर्मात तुम्ही का राहाता? धर्म माणसासाठी असतो, माणसे धर्मासाठी नसतात. तुम्हाला समाजात माणसासारखे मानसन्मानाने व स्वाभिमानाने जगायचे असेल तर तुम्हाला हिंदु धर्माचा त्याग करावा लागेल. धर्मातराशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही! माणसांना धर्माची गरज असते. धर्मामुळे माणूसबळ, आथि४क बळ व मानसिकबळ मिळते. धर्मामुळे व्यक्ती व समाज सुसंस्कृत बनतो. धर्म हे मानवी कल्याणाचे आणि आत्माद्धाराचे साधन आहे. त्यादृष्टीने तथागत बुद्धांचा बौद्ध धर्म हा मानवी कल्याणाचा, उद्धाराचा आणि मानेवांना अज्ञानातून सज्ञानाकडे, अंधारातून अकाशाकडे, अधोगतीतून, उन्नतीकडे नेणारा सत्य धम्म आहे. म्हणूनच अस्पृश्यांच्या उद्धारासाठी मी बौद्ध धम्माची निवड केलेली आहे. त्याचा आपणाला स्वीकार करायचा आहे. त्याकरिता सान्या अस्पृश्यानी तयार व्हावे. धर्मातराची वेळ व स्थळ मी जेव्हा जाहीर करीन तेव्हा तुम्ही धर्मांतर करण्याचा निश्चय करून यावे. असे बाबासाहेबांचे भाषण ऐकून दलित समाजात नवचैतन्य निर्माण झाले आणि
अस्पृश्य धर्मांतरासाठी तयार झाले,’आणि धम्मचक्र प्रवर्तन झाले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातर करण्याची सर्व तयारी केली, नागपूर है ठिकाण निवडले आणि १४ आक्टोबर १९५६ या विजयादशमी दिवशी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. त्यावेळी पाच लाख अस्पृश्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. एकाच वेळी पाच लाख लोकांनी धर्मांतर केल्याची जगाच्या इतिहासात ती एकमेव घटना आहे. एवढ्या मोठया प्रमाणात लोक बौद्ध झाले ते पाहून सारे हिंदु सतबुद्ध झाले. बौद्ध धम्माची दीक्षाघेतल्यानंतर बोधिसत्व बाबासाहेबांनी धर्मांतर केलेल्या बौद्धांना धम्मा बद्दल मार्गदर्शन केले. ते आपल्या भाषणात म्हणाले, आज मी माझी प्रतिज्ञा पुरी केली आणि मी हिंदु धर्माच्या नरकातून मुक्त झालो. बंधु भगिनींनो, आता मी तुम्हाला भगवान बुद्धाचा धम्म दिला आहे. आता तुमच्यावर धम्म पालनाची फारमोठी जबाबदारी आहे. तुम्ही या धम्माचे तत्वज्ञान व नियमांचे योग्य असे आचरण केले पाहिजे. मी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. ते तुम्ही केले नाही तर महारांनी बौद्ध धम्म बिघडवला.’असा तुमच्यावर आक्षेप होईल. कारण भगवान बुद्धानंतर त्यांच्याच अनुयांनी बौद्ध धम्म बिघडवला असा इतिहास आहे. त्यापासून बोध घेतला पाहिजे.तुमच्या चांगल्याआचार विचाराने बौद्धधम्माचे पावित्र्य व महत्व राखले पाहिजे. या धम्माचा दीप तुम्ही सतत तेवत ठेवला पाहिजे. मी यानंतर सारा भारत बौद्धमय करणार आहे.तेव्हा ती धम्म चळवळ तुम्ही गतिमान केली पाहिजे. आपल्या समाजात अनेक धार्मिक व सामाजिक अनिष्ट परंपरा, चाली शेती, देव धर्माबद्दल चे अंधश्रद्धा, आहेत त्या
सर्व सोडून दिल्या पाहिजेत. तुम्ही पुर्णपणे बौद्ध झाले पाहिजे. तुमच्याकडून अर्धे बौद्ध आणि अर्धे हिंदू, असे वर्तन होता कामा नये, तुम्ही भगवान बुद्ध आणि मला देव बनवू नका, तुम्ही अत्त दीप भव व्हा। बोधिसत्व, बाबासाहेबांचे ते मार्गदर्शन पर विचार ऐकून लोकांच्या मनात वैचारिक क्रांती झाली. आणि त्यांनी आपल्या घरातील व देव्हाऱ्यातील पूजलेले हिंदु देवी देवतांचे फोटो नदीत फेकून दिले. हिंदु संस्कृतीची जळमटेजाडून टाकळी. .देशभरात धर्मातराची एकच लाट उसळली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *