दिवाळीपूर्वी महाराष्ट्रातील सर्व बावीस लाख नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान( बोनस) मिळावे यासाठी कामगार मंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांना सांगलीत निवेदन

दिवाळीपूर्वी महाराष्ट्रातील सर्व बावीस लाख नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान( बोनस) मिळावे यासाठी कामगार मंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांना सांगलीत निवेदन

या दिवाळीपूर्वी महाराष्ट्रातील सर्व बावीस लाख नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान( बोनस) मिळावे यासाठी कामगार मंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांना सांगलीत निवेदन सादर.
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजत महाराष्ट्राचे कामगार मंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनाबाबत बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, कोविड च्या काळामध्ये महाराष्ट्रातील बारा लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी साडेसहा हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात आलेले आहे. तसेच यापूर्वी प्रत्येक बांधकाम कामगारास पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची योजना फेब्रुवारी 2020 मध्ये बंद केलेली आहे. त्यामुळे सन 2022 मधील या दिवाळीच्या वेळेस सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली.
याबाबत शिष्टमंडळास श्री सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले की, ते या मागणीबाबत सकारात्मक आहेत. परंतु याबाबतचा जो निर्णय आहे तो महाराष्ट् शासनाने घ्यावयाचा असून त्यामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी या येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मांडण्यात येईल. असे शिष्टमंडलास आश्वासन दिले.

प्रत्येक नोंदीत बांधकाम कामगारांना घरे मिळण्यासाठी जी योजना कामगार मंत्र्यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेली आहे त्याचे आम्ही स्वागत कामगार संघटनांनी केले

तसेच कामगार प्रतिनिधींनी चर्चेमध्ये बोलताना सांगितले की, सध्या महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सदतीस लाख अर्ज दाखल आहेत त्यापैकी 22 लाख अर्ज मंजूर असून अजूनही 15 लाख अर्जांची तपासणी करणे मंजूर करणे ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्याबाबत तातडीने निर्णय झाल्यास या दिवाळीपूर्वीसुद्धा कामगारांना दिलासा मिळणार असून कामगारांचे लाभांच्या अर्ज मंजूर होणार आहेत. याबाबतही सत्वर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन कामगार मंत्री यांनी बांधकाम कामगार संघटनांच्या शिष्टमंडळास दिले.

कामगार मंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर निवारा भवन येथे कामगार संघटना प्रमुख प्रतिनिधींची बैठक झाली.यामध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की, सध्या महाराष्ट्रामध्ये 22 लाख नोंदीत बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यायचे झाल्यास 2200 कोटी रुपये शासनाला द्यावे लागतील. सध्या बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठीच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 14 हजार कोटी रुपये शिल्लक असल्यामुळे दहा हजार रुपये देणे देण्याचा निर्णय घेण्यास शासनाला शक्य आहे.
याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ मुंबईस ऑक्टोबर 18 व 19 तारखेस जाणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले.
शिष्टमंडळामध्ये कॉम्रेड शंकर पुजारी,श्री संजय खानविलकर, श्री सुभाष लोखंडे, कॉ विशाल बडवे, कॉ संतोष बेलदार श्री नाशिर बारगीर श्री जितेंद्र ठोंबरे, श्री विनोद पानबुडे, श्री बाबासाहेब पाकजादे ,सोनाली चव्हाण, विद्या भोरे, शांताबाई चव्हाण, अमोल माने, दत्ता लोहार व सुरेश सुतार इत्यादींचा समावेश होता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *