शिवाजी विद्यापीठ सिनेट छाननी प्रक्रिया ही सदोष आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असून राज्यपालांनी त्यांची दखल घेऊन निवडणूकीस स्थगिती घ्यावी – फ्रेडशिप फौडेशन ची मागणी
कोल्हापूर – दिनांक – १ – शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून यामध्ये छाननी प्रक्रिये दरम्यान राबविण्यात आलेली प्रक्रिया ही गोपनीयतेचा भंग करणारी आणि विद्यार्थी उमेदवारावर अन्याय करणारी असून ती त्याविषयी थेट राज्यपाल राज्यपाल आणि त्यांचे प्रतिनिधन कुलगुरू यांनी लक्ष घालावे आणि त्याची फेर मांडणी करावी अशी मागणी फ्रेंडशिप फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष राजेश उर्फ बाळ नाईक यांनी केलेली आहे . छाननी प्रक्रिये करताना नोंदणीकृत पदवीधर मतदार केंद्र मतदार विभागातून डुप्लिकेट सह्या केल्याच्या फोनवरून मोबाईल फोनवर आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन ते अर्ज बाद करण्यात आले मात्र या तक्रारी नेमक्या कोण केल्या आणि ही माहिती नेमकी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली हे याबाबतीत शंकेला जागाही निर्माण झाली आहे आणि त्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याचा झाल्याचाही आरोप ही फ्रेंडशिप फौडेशनच्या वतीने करण्यात आलेला आहे . त्याचबरोबर नोंदणीकृत पदवीधर विभागात विद्यार्थ्यांचे पत्ते आणि अगदी लहान तांत्रिक बाबी पुढे करून अनेक अर्ज अवैध करण्यात आलेले आहेत या सर्वांचा फेर विचार करावा आणि अवैद्य केलेते सर्वच अर्ज आपल्याकडे घेऊन त्याची पुन्हा एकदा छाननी करावी आणि यामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावे अशी मागणी फ्रेंडशिप समूहाच्या वतीने करण्यात आली असून ही सदोष पद्धती लक्षात घेवून या निवडणूकीस स्थगिती घावी या मागणीचे निवेदन राज्यपाल यांच्या कडे कार्यालयास ईमेलद्वारे पाठवण्यात आलेली आहे तसेच जिल्ह्यातील सर्व आमदारांना आणि खासदारांनाही या निवेदनाच्या प्रती अध्यक्ष राजेश उर्फ बाळ नाईक सह उमेदवार राजेद्र मकोटे राजेश वाघमारे , प्रेमसिग चव्हाण , दिग्वीजय चरणकर याच्या स्वाक्षरी सह देण्यात आलेल्या आहेत .