जनशक्ती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने भाजपा शिंदे सरकारचा जाहीर निषेध मलाबादे चौक इचलकरंजी येथे करण्यात आला बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस दहा हजार रुपयाची मागणी केली होती महाविकास आघाडी सरकारमध्ये मा. माजी कामगार मंत्री हसन सो मुश्रीफ यांनी घोषणा करून सुद्धा दिले नव्हते व भाजपा शिंदे सरकारचे कामगार मंत्री मा. सुरेश भाऊ खाडे (साहेब) यांनी निवेदन देण्यास गेले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे संघटनेच्या वतीने भाजपा व शिंदे सरकारचा जाहीर निषेध संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. गणेश साहेब, व राज्य कार्याध्यक्ष मा. श्री. रजनीकांत माने, यांचे नेतृत्वामध्ये करण्यात आला यावेळी सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मार्गदर्शन करताना मा गणेश तडाखे यांनी सांगितले की मा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असे म्हणतात की हे सरकार गरिबांचे आहे शेतकऱ्यांचे व कामगार वर्गाचे सरकार आहे पण कामगार वर्गाच्या तोंडाला फक्त पाने पुसण्यात येत आहेत बांधकाम कामगारांचे 15000 कोटी शासनाकडे शिल्लक असताना हे शासन कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे देत नाहीत जर बोनस द्यायचा निर्णय त्यांनी घेतला नाही तर संघटनेच्या वतीने कामगार मंत्र्याच्या घरावर मोर्चा काढण्याचे आव्हान त्यांनी केले आहे त्यावेळी मार्गदर्शन करताना मा रजनीकांत माने यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की जनशक्ती संघटित कामगार संघटना एक कामगारांच्या हितासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी काम करेल जर आमच्या मागणीचा विचार केला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य महिला सचिव सौ. मिरा तडाखे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयश्री कांबळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र केंगार, इचलकरंजी शहराध्यक्ष तौफिक किल्लेदार , कमृद्दीन जमादार, अनिकेत धनगर ,अमित माने, अमिन अथणीकर, सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Posted inBlog
जनशक्ती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने भाजपा शिंदे सरकारचा जाहीर निषेध
