राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण – उद्योग मंत्री उदय सामंत

राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण – उद्योग मंत्री उदय सामंत

राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण

  • उद्योग मंत्री उदय सामंत
  • मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून राज्य एकसंघपणे काम करित आहे, असे चित्र निर्माण करण्याचे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. राज्यातील गुंतवणूकी संदर्भात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. सामंत पुढे म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन, सिनारमस, सॅफ्रॉन या कंपन्यांची गुंतवणूक राज्याबाहेर गेली असल्याचे आरोप होत आहेत. याबाबतच्या वस्तुस्थ‍ितीबाबत महामंडळाने यापूर्वीच खुलासा केलेला आहे. आवश्यकता पडल्यास याबाबत श्वेतपत्रिका जाहीर केली जाईल. ज्या प्रकल्पाला स्थानिकांचा पाठिंबा असेल असे प्रकल्प लवकर सुरु करण्यात येतील.राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत रांजणगाव (पुणे) येथे २९७.११ एकरमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्र सरकारने मान्यता दिली असून, असे अनेक प्रकल्प केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यात येतील, कारण अधिकाधिक प्रकल्प राज्यात यावेत आणि युवापिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यावर शासनाचा भर असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य गुंतवणुकीसाठी एक सर्वश्रेष्ठ राज्य ठरेल अशी प्रतिक्रिया श्रीमती आरती शर्मा यांनी व्यक्त केली. तर जितेंद्र महाजन यांच्या मतानुसार नवे सरकार स्थीर होताच महाराष्ट्रातील नवगुंतवणुकीला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला.</code></pre></li>

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *