एकात्म भारताच्या शिक्षणाचे
शिल्पकार मौलाना अबुल कलामआझाद
विनम्र अभिवादन
(11नोव्हेंबर 1888 जयंती दिनी)
आम्ही आंतर भारतीय आहोत म्हणजे भारतीय संस्कृती संचिताचे आम्ही स ह भागीदार आहोत सांस्कृतिक संचित ही एक व्यापक सर्वांच्या योगदानातू न निर्माण झालेली संचित गोष्ट असते धर्म संस्कृती कला साहित्य शिक्षण राजकारण या सर्वांनी मिळून सांस्कृतिक संचित हे तयार होत असते. भारताच्या सांस्कृतिक संचिताचे अनेक प्रदेश असतात या मधूनच बहुसंस्कृतिकता ही अशीच बनलेली असते बहुसंस्कृतिकतेचे मोठेपण हे यासाठी आहे की यामध्ये अनेक भाषिकांच्या धर्म बांधवाचां शतकांच्या जीवनाचा ठेवा असतो तो बहुसंस्कृतिक जीवनाच्या वारसा मधून पुढे चालत आलेला असतो म्हणून बहुसंस्कृतिकता ही सतत एकात्म जीवनाचा अतूट धागा बनून राहतो तो त्यासाठी शिरोधार्य मानणे तो जपने हे आपणा सर्वांचे आंतरभारतीय होण्यासाठी कर्तव्य आहे या कर्तव्याचा एक भाग म्हणून स्वातंत्र्य चळवळीतील थोर नेते मौलाना अबुल कलाम आझाद यांना आज अभिवादन करताना अनेक प्रकारचे विचार मनात येतात ते इस्लामच्या संस्कृतीचा गाढा अभ्यासक होते इस्लाम मधील अध्यात्म विद्या आत्मसात करून अनेक भाषेवर प्रभुत मिळवलेले उर्दू फारसी अरबी चे पंडित म्हणून जे जीवन जगले होते त्या अबुल कलाम आझाद यांना समजावून घेणे हे बहुसंस्कृतिक धन म्हणून समजून घेण्यासारखे आहे पाश्चात्य देशातील आधुनिक विचारमूल्य याचा प्रसार करणारे आणि अभिमान बाळगणारे मौलाना अबुल कलाम आझाद हे शिक्षण तज्ञ म्हणून भारत वर्षाला कायम वंदनीय राहणार आहेत ते इतिहासकार होते ते साहित्यकार होते ते पत्रकार होते ते स्वातंत्र्य योद्ये होते त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास झाला होता ते मागास रुढी आणि परंपरांना नकार देत असत जी जी गोष्ट विवेकाच्या आधारे पटत नाही जी सिद्ध होत नाही अशा अनेक कालबाह्य रूढी आणि परंपरांना ते नकार देणारे आधुनिक शिक्षणतज्ञ आणि विज्ञाननिष्ठ ज्ञान निष्ठावंत असे ते होते.
इस्लामचा अभ्यासक असूनही विज्ञानाबद्दल त्यांचे ठोस विचार होते जाती धर्म कालखंड यांच्या आधारे विज्ञानाचे विभाजन होऊ शकत नाही विश्वाचे एकात्मविज्ञान आहे आणि ते स्वीकारले पाहिजे अशा प्रगतीक विचाराचे मौलाना अबुल कलाम आझाद हे होते त्यांचा जीवनाचा आग्रह हा मानवी ज्ञान सतत निर्माण होणे स्वीकारणे असा होता
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरातील लाभले हे भारताचे सध्या त्यांनी आपल्या दृष्ट्या आकलनाचा वापर करून भारताच्या शिक्षण नीतीचा पाया रचला त्यामध्ये विविधतेतून एकता हे सूत्र शैक्षणिक उद्दिष्टाचार रचनेमध्ये कायम पाळले किंबहुना तो आधार तयार केला आणि त्यातूनच एकात्म भारताच्या रचनेचा प्रवास सुरू झाला महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू या थोर नेत्यांच्या समक्ष असले ले ते ऐक कुराणचे विद्वानभाषांतर कार म्हणून म्हणून भारताला वंदनीय आहेत.
एकात्म भारताचा धर्मनिरपेक्ष पाया रचणारे दृष्टे राष्ट्रनिष्ठ म्हणून इतिहास मौलाना अबुल कलाम आझाद यांना कायम स्मरणात ठेवील देशाचे विभाजन टाळणारे एकनिष्ठ भारतीय नेते म्हणून त्यांचे भारतावर कायम उपकार आहेत त्यांनी भारताच्या शिक्षण धोरणाचे तयार केलेले प्रारूप याचे महत्त्व स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या शिक्षण प्रवासा मधून प्रतीत होत देशाचे अन्नधान्याचे उत्पादन गरिबा चे पुनर्वसन स्वातंत्र्योत्तर काळात येणाऱ्या साथीच्या रोगांचा संकट यामधील असंख्य समस्यांना सामोरे जाणारे धैर्य शिक्षणातून युवकांच्या अंगी निर्माण करण्याची राष्ट्रभक्ती रुजवणारे शैक्षणिक धोरण याचे श्रेय मौलाना अबुल कलाम आझाद यांना जाते समाजाच्या सर्व कालखंडामध्ये आधुनिकता स्वीकारणारा वर्ग आणि पारंपारिकता आरोही परंपरा यांना चिकटून राहणारा वर्ग यांच्या संघर्षातून समाज पुढे जात असतो याचे भान असणारे अबुल कलाम हे द्रष्टे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांच्या स्मरण सतत करायला हवे. आजही भारत याच अवस्थेतून वाटचाल करत आहे सांस्कृतिकता आणि सामाजिकता यांचा संघर्ष ही सतत होत असतो सामाजिक सौहार्द निर्माण करणे हे राष्ट्राचे उद्दिष्ट असते याचे भान कलाम यांना होते त्याबद्दल ते प्रचंड सावधान होते शिक्षणाचा प्रसार मानवी नात्याच्या सौहार्द साठी हा त्यांचा कटाक्ष होता धार्मिकता भावनिकता सौंदर्य बोध मानवी मूल्यांच्या बद्दलची संवेदनशीलता हे सर्व समाज व्याप्त घटक असतात प्रत्येक समाजाने वाटचाल पुढे करायला हवी यातूनच संतुलित समाज नातेसंबंध निर्माण करायला हवेत यासाठी उदारनेतृत्व सर्व क्षेत्रातून तयार व्हायला हवे असा कटाक्ष मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या जीवनात बाळगला होता
मौलाना अबुल कलाम आझाद आपल्या इस्लामच्या संस्कृतीच्या अभिमानाबद्दल म्हणत असत तेराशे वर्षाच्या गौरवशाली इतिहासातून मला इस्लामचा दयाभाव हा वारसा मिळाला आहे मी तो सोडणार नाही मी इस्लाम मधील संस्कृती कला सभ्यता साहित्य हा वारसा उदात्तपणे जपणार आणि त्याचा अभिमान बाळगणार अशा स्वरूपाचा इस्लामचा सार्थ अभिमान कलाम हे बाळगत होते इस्लाम हा बाधक विचाराचा नाही तर तो पोषक विचाराचा आहे इस्लाम हा एकतावादी आहे एकतावादी विचार हे हिंदू संस्कृतीत मध्ये आहेत त्यामुळे या दोन्हीही संस्कृती एकात्मतेची सभ्यता प्रस्थापित करण्याचा आग्रह धरतात याबद्दल मला चूक वाटत नाही आणि मी याबाबत दोन्हीही संस्कृतींचा समान आदर करतो आणि त्यातून एकात्म भारताच्या साठी निर्माण साठी त्याचा प्रयत्न करीत राहणार नाही अशा स्वरूपाचे आजार यांचे विचार होते जागतिक कवी गटे विश्वशांतीचे संस्थापक रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी नेहरू यांच्या मूल्यांच्या वरील त्यांची निष्ठा अविचल होती त्यांचा सातत्याने आग्रह होता की उदारता सहिष्णुता अध्यात्म मूल्यांच्या बद्दल आदर जो आहे त्यात जीवनाच्या पूर्णत्वाचा प्रवास आहे त्यासाठीची साधना करायला हवी मानवते बद्दलची नितांत संवेदनशीलता या सर्व मूल्यांना एकत्र स्वीकारून वर्तमानातून वाटचाल करीत भविष्याकडे जात राहणे हा सांस्कृतिक अनव यार्थ आहे तो संस्कृतीचा आपणाला मिळालेला मोठा अंश आहे ते संस्कृतीचे उद्दिष्ट आहे ती आपल्या बौद्धिक एकात्मतेची खरी कृती आहे यातूनच सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ शकतो. अशा प्रकारचा विचार हा अबुल कलाम आझाद त्यांच्या जीवनाचे सार आहे.
1937 पासून भारताच्या शिक्षणाचा जो विचार सुरू झाला होता त्यामध्ये केंद्रीय शिक्षा विभागाने देशाच्या सर्वेक्षणाचा जो प्रयत्न केला त्यामध्ये आजारांचे योगदान मोठे होते त्यांनी तयार केलेल्या अहवालामध्ये अत्यंत तर्कसंगत काही सूचना सुचवलेल्या होत्या त्यातूनच भारतीय शिक्षणाचे खरे वास्तव पुढे आले आणि भारताला शिक्षण क्षेत्रात आर्थिक सहाय्यता मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे भारतीय शिक्षण हे तंत्र युक्त विज्ञान अधिष्ठित असे देण्याचे सुरुवातीपासून प्रयत्न करायला हवेत त्यासाठी त्यांनी अखिल भारतीय शिक्षण परिषद माध्यमिक शिक्षण विस्तार आयोग प्रौढ शिक्षा परिषद ग्रामीण उच्च शिक्षण केंद्रीय समाज कल्याण बोर्ड आणि शिक्षण परिषद या सर्व प्रकारच्या व्यवस्था स्वतंत्रपणे तयार करण्याची कल्पना त्यांनी राबवली आणि त्यातूनच भारतीय शिक्षणाचा हा रचना पाहाया घातला गेला आहे.
मौलाना आझाद यांचे आणखी योगदान हे स्पष्टपणे नोंदवायला हवे की त्यांनी विज्ञान आणि वैज्ञानिक अनुसरण संस्था शिष्यवृत्ती यांच्या निर्मितीचे प्रयत्न केले शारीरिक शिक्षण मनोरंजन युवक कल्याण समाजसेवा शिबिर या योजना त्यांनी प्रथम सुरू केल्या आणि आजही त्या तशा भारतात चालू आहेत सांस्कृतिक संपर्क परिषद ही एक नवी संस्था स्थापन करून अंतर भारतीय आधार प्रधान नवा विचार स्वीकार या प्रकारचे ज्ञान पर्यावरण त्यांनी प्रथम तयार केले हे विसरता कामा नये यांच्या या उदार शैक्षणिक दृष्टिकोनाचा व्यापक परिणाम पुढील प्रमाणे झाला आहे भारताच्या उदारमतवादी सहिष्ण सांस्कृतिक समन्वयाच्या एकात्म रचनेच्या दिशेने प्रवास झाला आहे
1951 मध्ये युनेस्कोच्या परिषद उद्घाटन प्रसंगी बोलताना मौलाना अबुल कलाम आझाद यांनी नमूद केले होते की पूर्व आणि पश्चिम हे दोन्हीही जागतिक विचार प्रवाह यांच्यामधील मानवता एकत्रित आली पाहिजे त्यासाठी शिक्षणाचा प्रारंभ आणि कार्य झाले पाहिजे हे दोन्ही विचार प्रवाह विरोधी नाहीत हे जाणून जाणीव करून देणारे ते पहिले भारतीय शिक्षण मंत्री होते.
भारताच्या अंतरीक अध्यात्मिक अनुभूतीबद्दल त्याचे स्पष्ट विचार होते की भौतिक सत्ता ही अंतिम नाही आधुनिक विचार व विज्ञान प्रगतीचा आग्रह या दोन्ही विचारधारांच्या मध्ये आंतरिक ्ष शांतीचा शोध घेण्याचा प्रयत्न प्राचीन महानू भवांनी केला आहे हीच ती ईश्वरीय सत्ता आहे ईश्वराच्या अस्तित्वाचा क्षण अनुभविने म्हणजेच आंतरिक शांतीच शोध घेणे होय त्यासाठीच “तत्व मसी” हा भारतीय संस्कृतीचा मूल सिद्धांत समजून घेतला पाहिजे सर्व वस्तूंच्या मध्ये तू आहेस ते तुझेअस्तित्व आहे ते तुझे रूप आहे तो तुझा अर्थ आहे ते तुझे जीवन आहे तेच खरेअस्तित्व आहे यातूनच सर्व वस्तुमात्रांचा अंतरिक संबंध जोडला जातो आणि हा संबंध जोडणे व शोधणे हेच जगाचे व जगण्याचे अर्थ आहेत .तो अर्थ शोधणे त्याचअन्वेषण करणे हे जीवन होय.
मौलाना अबुल कलाम आझाद हे अध्यात्मिक वादी परंतु प्राकृतिक समन्वय संस्कृतिक वादी असे होते विज्ञानाचा विकासासाठी वापर धर्म श्रद्धांजली गुणांच्या विकासासाठी वापर सामाजिक न्याय मैत्री तर्कसंगत जीवन दृष्टिकोन आणि या सर्वांच्या मधून शांतीचा व समाज सामाजिक समृद्धीचा प्रवास प्रत्येक व्यक्तीने करीत राहणे हा जीवन अर्थ मौलाना अबुल कलाम आझाद हे आपल्या विचारातून सतत प्रकट करीत असत
मौलाना अबुल कलाम आझाद हे आत्मवादी होते ते नेहमी म्हणत असत वैयक्तिक सामुदायिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपला स्वयंशोध स्वतःला घेता आला पाहिजे मी कोण आहे? माझ्या जगण्याच उद्दिष्ट काय आहे ?मला या विश्वाच्या पसाऱ्यात अर्थ काय आहे ?हे प्रश्न स्वतः स्वतःला अगोदर विचारावेत त्याचा अर्थ मिळवावा तो प्राप्त करावा आणि मगच या वैयक्तिक समस्यां निराकरणासाठी प्रयत्न करावेत थोडक्यात स्वयंशोध घेऊन विशुद्ध वर्तनाच्या आधारे या प्रश्नांच्या कडे पाहावे असा त्यांचा आग्रह होता व्यक्ती ही काही नसून विश्वाचा एक छोटा घटक आहे ब्रह्मांडाचे ते प्रतिबिंब आहे असेही त्यांचे विचार होते ते म्हणत कोणत्याही संकट आणि रोगाची कारणे तुमच्या अंतरिक अज्ञानामध्ये आहेत तुम्ही त्यावर आंतरिक विशुद्ध भावनेने प्रयत्न करायला हवा उपचार करायला हवेत हे तुम्ही ओळखले पाहिजे की आपण एक सामान्य जीव आहोत इतके विश्व अगाधआणि अनंत आहे तुमच्यामध्येच विश्वाचे सर्व अर्थ आणि रूप प्राप्त होतात हे समजून घेणे हा अध्यात्मिक विचार त्याचा होता ते त्याचे विवेचन करीत असत मानवी बुद्धीचा विकास या दिशेने व्हावा नैतिक भावनांचे उन्नयन आशादायी जीवन आणि ध्येयाची निरत र वाटचाल करीत राहणे हे अत्यंत आवश्यक आहे इस्लामच्या संस्कृतीचा प्रकार पंडित पाश्चात्य ज्ञानाचा अवग्रहण करता व पौरत्य संस्कृतीचा समन्वयक म्हणून भारताच्या सर्व पिढ्यांनी सतत त्यांच्या कृतार्थ अभिवादनात व्यस्त राहायला हवे
विनम्र
अभिवादन
कर्ता
शिवाजी राऊत
शाळाबाह्य शिक्षक .सातारा 11 नोव्हेंबर 22 वेळ7 20