कबनूर प्रभाग पाच मधील मुस्लिम समाज कब्रस्तान येथे आमदार फंडातून पेविंग ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ
कबनूर -(प्रतिनिधी चंदुलाल फकीर) माननीय आमदार प्रकाशअण्णा आवाडे यांच्या आमदार फंडातून प्रभाग पाच मधील मुस्लिम समाज कब्रस्तान मधील रिकाम्या जागेत पेविंग ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रभाग पाच मधील मुस्लिम समाजाची अनेक दिवसापासूनची पेंविंग ब्लॉक बसवण्याची मागणी होती आमदार आवाडे साहेब यांनी तसा शब्द मुस्लिम समाजास दिल्याप्रमाणे त्यांच्या फंडातून सदरच्या कामाचा शुभारंभ करून वचनपूर्ती केली सदर कार्यक्रम प्रसंगी माजी उपसरपंच निलेश पाटील, जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे, माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य मधुकरराव मणेरे,सुधीर लिगाडे, समीर जमादार, वैशाली कदम,अर्चना पाटील, सुलोचना कट्टी,स्वाती कडप्पा, सुनीता अडके, कुंदन आवळे, संजय कट्टी,मनोहर मणेरे, शिवाजी वडर,मेहबूब मुल्ला,जावेद फकीर,शैफ मुजावर, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हैदर मुजावरसर यांचेसह समाजातील नागरिक हजर होते.
Posted inBlog
कबनूर प्रभाग पाच मधील मुस्लिम समाज कब्रस्तान येथे आमदार फंडातून पेविंग ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ
