16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 पासून महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटकचे तिसरे अधिवेशन सांगली मराठा सेवा सांस्कृतिक भवन सांगली.
महाराष्ट्रामध्ये 20 पेक्षाही जास्त जिल्ह्यांच्यामध्ये काम असणाऱ्या आयटक बांधकाम कामगार फेडरेशनच्या तिसऱ्या अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून कॉ प्रवीण कुमार गौडा हैदराबाद, महाराष्ट्र आयटेकचे अध्यक्ष कॉ सी एन देशमुख, सांगलीचे महापौर श्री दिग्विजय सूर्यवंशी, सांगली काँग्रेस पक्षाचे नेते श्री पृथ्वीराज पाटील, कामगार नेते कॉ अतुल दिघे, कॉ उदय चौधरी, जनता दल जिल्हा अध्यक्ष एड. के डी शिंदे, बळीराजा पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब रास्ते, आयटक संघटनेचे कॉ महेश जोतराव हिंदू मजदूर सभेचे साथी विकास मगदूम,सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते पी एन काळे, बिल्डर श्री विनायक गोखले, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ कुमार लोहार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री संदीप राजोबा,महानगरपालिका युनियनचे नेते कॉ तानाजी पाटील व आयटक चे नेते कॉ उदय चौधरी इत्यादी पाहुणे या मेळाव्यास अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र आयटक फेडरेशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार संघटनेचे कार्य चालते. फेडरेशनच्या वतीने मागील चार वर्षापासून अनेक आंदोलने करून बांधकाम कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य करून घेऊन विविध लाभ बांधकाम कामगारांच्या पदरात पडलेले आहेत.
यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहसाठी ५१ हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची योजना अमलात आणली. नोंदीत बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची योजना मंजूर करण्यास संघटनेने मंडळास भाग पाडले. काही ठिकाणी या योजनेची अंमलबजावणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. उदा. सांगली जिल्ह्यामध्ये पोपट शेटे व कामते या दोन मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मिळवून देण्यात आले.
यापुढील काळामध्ये ही दरवर्षी दिवाळीच्या वेळेस दहा हजार रुपये बांधकाम कामगारांना बोनस मिळाला पाहिजे. राज्यातील सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना घरकुले बांधून दिली पाहिजे यासाठी जोरदार आंदोलन करण्यात येणार असून त्याबाबतच्या नियोजनाबाबत या अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
या संदर्भात शनिवारी पत्रकार बैठक होऊन त्या पत्रकार बैठकीस कॉ शंकर पुजारी, कॉ सुमन पुजारी, कॉ वैभव बडवे व कॉ रोहिदास राठोड इत्यादी उपस्थित होते. असे पत्रक युनियनचे सचिव कॉ विशाल बडवे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
Posted inBlog
सांगली येथे16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटकचे तिसरे अधिवेशन
