आई-वडिलांची सेवा करणे हेच आद्य कर्तव्य… पी एस कांबळे यांचे प्रतिपादन!
(कालकथीत सोनाबाई नामदेव मोरे यांच्या ९व्यास्मृतिदिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा व जय भीम तरुण मंडळ राधानगरी यास साऊंड सिस्टिमचे वाटप!
गुडाळ वार्ताहर/ संभाजी कांबळे
राधानगरी येथील सोनाबाई नामदेव मोरे यांचा ९वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला यावेळी रिपब्लिक पार्टीऑफ इंडिया (गवई) गटाचे सरचिटणीस पीएस कांबळे म्हणाले की !आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागर आई माझी. याप्रमाणे प्रत्येकाने आई-वडिलांची सेवा करणे हे आद्य कर्तव्य आहे ;माझी बहीण सोनाबाईअशिक्षित होती परंतु शाहू फुले आंबेडकर व माता रमाईच्या विचाराची होती तीची एकच जिद्द माझा मुलगा व माझ्या मुली मोठ्या अधिकारी झाले पाहिजे हे स्वप्न तिच्या कायमस्वरूपी मनात असायच त्याचप्रमाणे माऊलीने करून दाखवले त्यांचा मुलगा प्रकाश मोरे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत व तसेच सोनाबाईच्या मुली सुद्धा चांगले शिक्षण प्राप्त करून मोठमोठ्या पदा वर काम करत आहे प्रकाश मोरे यांचे वडील नामदेव मोरे हे पाटबंधारे विभाग कामाला होते परंतु त्यांचेही शिक्षण कमी होते परंतु त्यांची जिद्द अशी होती की माझी मुलं अधिकारी झाली पाहिजे .प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते ते स्वप्न प्रकाश मोरे त्यांच्या रूपाने आपणास पहावयास मिळते ..
यावेळी पत्रकार संभाजी कांबळे यांनी आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केले की राधानगरी तालुक्यामध्ये शाहू, फुले आंबेडकर, व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारातून प्रेरित झालेले प्रकाश मोरे कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुंबई येथे शाखा अभियंता म्हणून अधिकारी म्हणून आहेत यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे…
यावेळी भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष डी एस कांबळे, सातापा सामंत, कोते, समाधान कांबळे (मासुर्ली) सिताराम कांबळे अशोक कांबळे, दीपक कांबळे, युवराज कांबळे, ओंकार कांबळे युवराज कांबळे (पनोरीकर) राजेश तांबे ‘सुनील कांबळे, नाथाजीकांबळे( पुंगाव) बबन कांबळे अडोली संभाजी कांबळे गुडाळकर कार्यक्रमाचे स्वागत सातापा सामंत यांनी केले तर आभार डी एस कांबळे यांनी मांडले