अमरकुमार तायडे यांची यशाला ही गवसणी
सध्याची युवापिढी सोशल मीडियामध्ये गुरफटली आहे. अशी ओरड आहे. मात्र याला फाटा देत मलकापूरातील एका तरुणाने उत्तुंग भरारी घेतली आहे. गोपाल कृष्ण नगर मधील अमरकुमार आनंद तायडे ह्या तरुणाने अमेरिकेतील नामांकित साऊथ वेस्टन युनिव्हर्सिटी मधून समाजशात्र मध्ये पीएच. डी मिळवली आहे. अमरने आपल्या बुद्धीच्या जोरावर कमी कालावधी मध्ये अमेरिकेसारख्य नामांकित युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरेट घेऊन एक रिकोड
बनवला आणि आपले नाव सुवण अक्षरात कोरले.
या तरुणाचे हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे. मलकापूर सारख्या भागात राहून अमरने हे यश मिळवून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण अमरावती विद्यापीठामधून तर इतर पदवीचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण झाले आहे.
जिद्द व चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते हे त्याने दाखवूनच नव्हे तर सिध्द करून दाखविले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्थान मानले त्यांचा प्रेरणेमुळे अमरने उंच ध्येय गाठले. यासाठी त्याचा ताईने व मावशीने त्याला सातत्याने प्रोत्साहन दिले. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी अमेरिकेतील साऊथ वेस्टन युनिव्हर्सिटीच्या झालेल्या दीक्षांत समारंभात प्रा. डॉ. जॉन पीटर , डॉ लियाकत अली खान, डॉ.वेद प्रकस आयती, डॉ. मिलींद दहीवले, प्रा. आर. के. शंकरनायर, डॉ. अशोक बालसुम्बण्यम यांचा उपस्थिती मध्ये अमरला डॉक्टर ऑफ फिलॉसॉफय या उपाधीने सन्मानित केले. त्याचा अगणित यशा बद्दल देशातूनच नवे तर विदेशातूनहि त्याचे कौतुक होत आहे .