राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त शहरात भव्य संविधान रॅली

राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त शहरात भव्य संविधान रॅली

राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त शहरात भव्य संविधान रॅली

मलकापूर : शहरात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिना निमित्ताने भव्य संविधान जनजागृती अभियान अंतर्गत द पीपल्स बहुउद्देशीय संस्था मुंबई महाराष्ट्र चे संविधान प्रचार प्रसारक अमरकुमार आनंद तायडे यांचा नेतृत्वात संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मलकापूर शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळाचा तसेच NCC मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. हि रॅली सकाळी १०:३० वाजता जनता कॉलेजच्या पटांगणापासून ते मलकापूर तेथील रेल्वे स्टेशन समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या पर्यंत काढण्यात आली होती, रॅली मध्ये संविधान चिरवू हो, संविधानाची हीच ग्वाही,उच्च-नीच कोणी नाही,लोकशाहीचा जागर,
संविधानाचा आदर, अरे डरने की क्या बात है?संविधान हमारे साथ है, अशा घोषवाक्यनी मलकापूर शहराचे वातावरण संविधान प्रेमी झाले होते. सदर प्रभातफेरी बुलढाणा रोड मार्गी, बसथानका चौक, सत्यम चौक, तहसील चौक असा कर्मश मार्गक्रमण करत
या रॅलीची समाप्ती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आली, त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मलकापूर शहर पोलीस निरीक्षक भोरखडे साहेब यांनी पुष्य हार अर्पण केले. त्यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन उपस्थित शालेय मुलाकडून व नागरिकांनकडुन करून घेतले. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते भिमराज इंगळे, करण झनके, धिरज इंगळे, सिद्धांत इंगळे, शुभम सावळे, रोशन चंदनशिव, आशिष पवार, रमेश झनके, मंगेश मेढे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमसाठी सर्व शाळांच्या प्राचार्य व मुख्यद्यापकानी सहकार्य केले, तसेच शहर पोलीस प्रशासन मलकापूर यांचे मोलाचे सहकार्य लाभेले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *