● हे संमेलन नसून महाराष्ट्रातील मना मनांना जोडणारा मैत्रीचा मोरपंखी धागाच,●
★★★★★★★★★★★
सुगंघ मैत्रीकट्ट्याचा मनात
नेहमी दरवळत राहील
परिमळाने शब्दांच्या रोजच
समूह गंधळत राहील
रजत डेकाटे //नागपूर प्रतिनिधी ✍️
ज्याप्रमाणे अचानक एखादी पावसाची सर यावी आणि संपूर्ण आसमंत प्रफुल्लित होऊन जावे, मृगाच्या पहिल्या सरीबोबत मोरही नाचायला लागावेत असेच काहीसे काल वाटून गेलं. मैत्रिकट्टा कविमनाचा साहित्य समूह आयोजित पाहिले राज्यस्तरीय कविसंमेलन,पुरस्कार वितरण सोहळा आणि स्पंदन चारोळी संग्रह लोकार्पण सोहळा पार पडला असे वाटले की हा सोहळा नसून संपुर्ण महाराष्ट्रातील मना मनांना जोडणारा मोरपंखी धागा होता.
यशोमंगल हॉल च्या प्रवेशद्वारावर पाहिलं पाऊल पडलं आणि अगदी रात्रभराच्या प्रवासाचा शीण क्षणात नाहीसा होऊन मन अगदी प्रसन्न झाले,कारण नजरेस पडली साखरे मॅडमच्या मुलीने रेखाटलेली सुरेख नक्षीदार रांगोळी,खरे तर ती रांगोळी नव्हतीच ते होते मैत्रिकट्टा समुहाचे लोगो. प्रवेशद्वारावर नेहमीसारख्या हसमुख असलेल्या अल्का मॅडम मिळाल्या खरे तर मी त्यांना आधी ओळखलं नाही पण त्यानीं मला ओळखलं,सर्वांनसारखी माझीपण मॅडमशी पहिलीच भेट तरीसुद्धा अगदी समोर येतच त्यांनी ओळखलं आणि तितक्याच नम्रतेने स्वागत करून हॉल मध्ये जाण्यास सांगितले. हॉल मध्ये प्रवेश करताच नजरेस पडले सुंदर फुलांनी नक्षीदारपणे सजविले आणि रंगीत प्रकाशकिरणांच्या उधळनीने न्हाऊन निघालेले रंगमंच,जणू असंख्य चांदण्याचा सडा पडावा, लक्षावधी टीमटीमनाच्या काजव्यांची मंडई संभाजीनगरातील यशोमंगल सभागृहात भरावी असेच काहीसे झाले,एकंदरीत विलोभणीय आणि हरवून जाणारे दृश्य.
दुरून दुरून येणाऱ्या कविमित्रांना अगदी शिस्तबद्ध अशी शयनव्यवस्था मॅडमनी आधीच करून ठेवली होती हे आत गेल्यावर समझले. कविसारस्वतांसाठी वेगळी खोली आणि कवियित्रीसाठी वेगळी खोली इथपासून काटेकोरपणे व्यवस्था मॅडमनी करून ठेवली.गेल्याबरोबर रात्रभराच्या प्रवासाचा क्षीण निघेऊन जावा यासाठी गरम पाण्याची व्यवस्था ही सुद्धा कार्यक्रमाला यशस्वी करण्याची उच्चकोटीची कल्पना दिसून आली.
थोड्याच वेळात सर्वांसाठी नाष्टा चहा आला आणि तोही अगदी स्वादिष्ट यावरून कार्यक्रम किती उच्च दर्जाचे होणार आहे याचे अंदाज मनाला यायला लागला होता. पाहुण्यांचे आगमन हॉल मध्ये होताच सर्व कविसारस्वतांनी ऊभे होऊन टाळ्यांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले हासुद्धा मैत्रिकट्टा समुजाच्या संस्काराचा भाग वाटला. क्षणात कार्यक्रमाची सुरुवात झाली सुरवातीला गायकवाड मॅडम नी आपल्या आराध्याना ओवीच्या माध्यमातून शब्दसुमानाची आदरांजली दिली त्यानंतर आपल्या सुमधुर आवाजात शब्दफुलांनी मान्यवरांचे स्वागत केले वातावरण अगदी सुगंधीत होऊन गेले,शब्दांचा गोडवा कितीही मधुर असला तरी पुष्पांचा सुगन्ध काही औरच असते त्यामळे पाहुण्यांचे स्वागत संपुर्ण मंच सुगंधीत आणि प्रफुल्लित व्हावे अश्या ताज्या गुलाबाच्या गुच्छान्नी आणि मानवस्त्र, सन्मानचिन्ह, व मानपत्र देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि त्याचवेळी मैत्रिकट्टा समूहाच्या सर्व आयोजकांनी सर्वांची मने जिंकून घेतली,सर्व पाहुणे झालेल्या आदरतिथ्याने अगदी भारावून गेले.लागलीच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील 10 कवी साहित्याकांचा समाजभूषण,साहित्यरत्न पुरस्कार देऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. ही कल्पना ज्या कुणाच्या मनात आली त्यांचे आभार मानावे तितके कमीच.नंतर प्रसंग आला मैत्रिकट्टा समूहाच्या संस्थपिका की ज्यांच्या कल्पनेतून हे संमेलन साकार आणि पूर्णत्वास गेले अश्या मा.कवियित्री अल्का साखरे मॅडम यांच्या प्रस्ताविकाचे मॅडम नी आपल्या प्रास्ताविकात आजपर्यंत केलेल्या कष्टाचे सूतोवाचन अगदी प्रत्येक शब्दाला सुवर्ण मुलामा चढवावा अश्या शब्दात केले. त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रथम समूह आणि त्यानंतर सगळे,आजवर ज्या नियमाने ज्या कणखर बाण्याने समूह चालवले,चुकीला माफी न देता शिस्त, शिकवण,आणि शिक्षा अश्या त्रि-सूत्रीचा वापर करून समूह अव्याहत कसा सुरू आहे,संमेलनासाठी किती कष्ट घेतले याचा अहवाल मॅडम नी प्रास्ताविकात मांडले.
त्यानंतरचा क्षण तीस कवी सारस्वतांनी आपल्या विचारांची मुक्त उधळण केलेल्या व कवियित्री अल्का साखरे यांनी संपादन केलेल्या चारोळी संग्रहाचे लोकार्पणाचा आणि तो क्षण आला.मंचावरील सर्व प्रसिद्ध आणि नावाजलेल्या हातांनी संग्रहाचे लोकार्पण करून चारोळी संग्रहाला अमरत्व प्रदान केले,संपुर्ण सभामंच व हॉल मधील सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्पंदनचे स्वागत केले हा मनाच्या मखमली तिजोरीत कायम कैद करून ठेवण्यासारखा क्षण.
*नंतर सपनदांच्या भाष्यकाराची भूमिका मला बजावयाची होती तसा एखाद्या पुस्तकावर भाष्य करणे हे अतिशय कठीण कार्य पण आपणा सर्वांच्या प्रेरणेने आणि मैत्रीच्या शक्तीने तेही योग्यरीत्या पार पाडण्यात आली.
कार्यक्रमाचे उदघाटक मा अनिल साखरे सर यांनी आपल्या मनोगतातून या कार्यक्रमासाठी काय काय खटाटोप केला हे सांगितले,आणि खरच त्यांच्या शिवाय कदाचित औरंगाबाद येथे इतका भव्य आणि भरदार कार्यक्रम कदाचित घडून आला नसता.खूप मोठ्या मनाचा माणूस आपणाला कार्यक्रमात उदघाटक म्हणून लाभले आणि कार्यक्रमात चार चांद लागले.
*आणि सगळ्यात शेवटी ज्याची प्रतीक्षा होती ती म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.हबीब भेंडारे सर यांच्या भाषणाची,त्यांचे मनोगत सुरू झाले तेव्हापासून शेवटपर्यंत कुणीही जागेवरून हललेसुद्धा नाही कारण,एक कवी कसा असावा,कविता कशी लिहावी,तिला प्रभावी कशी करावी,किती दिवसात एक कविता* पूर्ण करावी.कवितेत सुधारणा कशी करावी कविता प्रभावी होण्यासाठी काय हवे,नी काय नको या विषयीचे सविस्तर आणि मार्मिक बोधमृत सरांनी सर्व नवकवी आणि हॉल मधल्या सर्वांना पाजले.हा अमृताचा खजिना प्रत्येकाला एक मजबूत आणि परिपक्व कवी बनण्यास निश्चितच मदत करेल यात कुठलीच शंका नाही,खूप खूप धन्यवाद हबीब सर.
पहिल्या सत्राचे समर्पण कल्पना मॅडमच्या आभाराने झाले मॅडमनी आपल्या मंजुळ आवाजात सर्वांचे मनापासून आभार मानले. त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांना कवी सारस्वतांना मिष्टान्न भोजनाची मेजवानी देण्यात आणि अगदी साखरे मॅडमचे तोंडभरून कौतुक करावे असेच चविष्ट आणि दर्जेदार जेवणाची मेजवानी मॅडमनी दिली, ती खूप दिवसपर्यंत आठवणीत राहील हे मी अनुभवाने सांगतो.
दुसरे सत्र सुरू झाले ते कवी सम्मेलनाचे ते म्हणजे नागपूर च्या प्रसिध्द विचारवंत कवियित्री, अनेक भूषणे ज्यांनी आपल्या शिरपेचात मनाने रोवली अश्या अत्यंत प्रतिभावान, वक्त्या, लेखिका अधिव्याख्याता, डॉ.यमुना नाखले मॅडमच्या अध्यक्षतेखाली,प्रत्येक कवीने आपल्या लेखणीची ताकत अक्षरशः दाखवून दिली,एकापेक्षा एक सरस कविता कविमाडळींनी सादर केल्यात की लिहायला शब्द अपुरे पडावे. आणि मला सर्वात जास्त जी कविता आवडली ती कार्यक्रमात आलेले निमंत्रित कवी मा.कवी सचिन वालतुरे सर यांची,अगदी अथांग सागरातून एक एक मोती उचलावे तसे कवितेतील एक एक शब्द,आपल्या कंठस्त गळ्यातून स्वरांकित करत सरांनी कविता सादर केली ती एका वेगळ्या भावविश्वात घेऊन गेली आणि स्वर्ग सुखाचा आनंद देऊन गेली.
शेवटी कविसम्मेलनाध्यक्षा मा.नाखले मॅडम चे अध्यक्षीय मनोगत झाले,प्रत्येक कवींच्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यात प्रवाह करून त्यांच्या रचनेवर अगदी समर्पक शब्दात विवेचन करून मॅडम नी असलेल्या प्रत्येकाची मने जिंकून घेतली.कुणालाही वाटत नव्हते की अध्यक्षाद्वारे माझ्या कवितेची दखल भाषणात घेण्यात येईल परंतु मॅडमनी प्रत्येक कवींच्या रचनेला भरभरून दाद देत कवितेला अमरत्वाच्या चरणबिंदूपर्यंत नेले .त्यावरून आयोजकांनी ज्या प्रतिभाव व्यक्तीची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड केली होती ती सार्थ ठरली असेच वाटत होते.
दोन्ही कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संचालन करणारे अनिल पाटील सर हेही प्रत्येक मनात घर करून गेले,अगदी व्यवस्थीत आणि यथोचित, आपल्या साहित्यक शब्दांनी दोन्ही कार्यक्रमाचे संचालन करून संचालनासाठी योग्य व्यक्तीची निवड सार्थ केले.
शेवटी सगळे पुन्हा परतीच्या वाटेकडे,आपापल्या खोप्याच्या दिशेकडे आनंदाने मार्गस्थ झाले ते पुढील वर्षीच्या संमेलनात पुन्हा भेटण्याचा निरोपाच्या शब्दांच्या प्रसव वेदनेने.