प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि एचआयव्ही आणि एसटीआयवर आरोग्य तपासणी शिबीर
रजत डेकाटे // नागपूर प्रतिनिधी ✍️
शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, नागपूर यांच्या वतीने प्रादेशिक परिवाहन अधिकारी कार्यालय नागपूर (ग्रामीण) येथे महामार्गावर जाणाऱ्या ट्रक चालकांसाठी रस्ता सुरक्षा जागरूकता आणि सल्लामसलत, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि एचआयव्ही आणि एसटीआयवर आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर अयोजित करण्यात आले त्याप्रसंगी प्रमुख उपस्तिथि प्रादेशिक परिवाहन अधिकारी श्री विजय चौव्हाण सहायक प्रादेशिक परिवाहन अधिकारी श्री. शांताराम फासे, श्रीमती. स्नेहा मेढे, श्री. राजेश सरक, श्री. अश्फाक अहमद, श्री. पुरुषोत्तम कनोजे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्यारे खान साहेब सदस्य राष्ट्रीय रस्ता सुरक्षा समिती,भारत सरकार व समस्त कार्यरत अधिकारी प्रादेशिक परिवाहन अधिकारी कार्यालय नागपूर (ग्रामीण) उपस्तिथ होते आणि कार्यक्रमाचे सूत्र संचालन सरिता सामटकर यांनी केले.
शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, नागपूर 11 जानेवारी 2023 ते 10 फेब्रुवारी 2023 दरम्यान “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना” साजरा करत आहे. संस्थेचा उपक्रम “ट्रक ड्रायव्हरचे कम्युनिटी वेल्फेअर” “ट्रक ड्रायव्हरचे फिटनेस सर्टिफिकेशन मोहीम” राबविण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष श्री. अभिषेक दुधलकर कोषाध्यक्ष श्री. अल्पेश नपते सदस्य शुभम चौव्हाण, पंकज पटेल सह्याद्री संस्था, नागपूर प्रकल्प संचालक विकास पाटील, प्रियांका पवार व संस्थेचे सर्व सहकारी व तज्ञ डॉक्टर श्री ओम शेंडे, सल्लागार दीपाली ग्रामीण रुग्णालय हिंगणा, नागपूर यांच्या तर्फे ट्रक चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असून ट्रक ड्रायव्हर ला फिटनेस प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
भारतीय अर्थव्यवस्थेतील या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिरेखांसाठी रस्ता सुरक्षा जागरूकता व आरोग्य सुविधांच्या सुधारणेच्या दिशेने योगदान देण्याच्या प्रयत्नात, संस्थेचा उपक्रम हा ट्रक चालकांसाठी कल्याणकारी ठरला.