महाराष्ट्रामध्ये ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध!
इतर कोणत्याही राज्यापेक्षा अगोदरच जास्त विजेचे दर महाराष्ट्रामध्ये असून सुद्धा त्यामध्ये आणखीन 37% पर्यंत वीजदरवाढ वाढ करू पाहणाऱ्या शासनाचा निषेध करून त्याबाबतच्या हरकती आणि सूचना 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत जास्तीत जास्त नागरिकांनी दाखल कराव्यात असे महाराष्ट्र बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीने आवाहन करीत आहोत. हरकती/ सूचना अर्ज सांगली निवारा भवन शहीद भगतसिंग चौक(सावंत प्लॉट डी मार्ट जवळ) येथे उपलब्ध असून ते अर्ज विनामूल्य देण्यात येतील.
याबाबत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी शंकर पुजारी यांनी सांगितले की. वीज महावितरण कंपनीवर जगभर बदनाम झालेले भारतीय भारतीय जनतेने बँकेत ठेवलेले आणि शेअर्समध्ये गुंतवलेले किमान दहा लाख कोटी रुपयांची लूट करणारे गौतम अडाणीचे वर्चस्व आहे. या गौतम अडाणींच्या भल्यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने ही दरवाढ सुचवलेली आहे. संघटनेकडे जमा झालेल्या हरकती सूचना अर्ज बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने 15 फेब्रुवारी पूर्वी मुंबईत वीज महावितरण कंपनीकडे दाखल करण्यात येतील.
सध्या प्रचंड महागाई वाढत असून त्यामध्ये मध्यमवर्गीय, कष्टकरी कामगार भरडून निघत आहेत. तसेच बांधकाम कामगार, आशा महिला सर्व असंघटित उद्योगातील कामगार यांना ही वीजदर वाढ अत्यंत जाचक होणार आहे.
म्हणूनच सर्व जनतेने हरकती सूचना देऊन प्रतिकार करावा असे आवाहन करणारे पत्रक निवारा बांधकाम कामगार संघटनेचे सचिव कॉ विशाल अशोक बडवे यांनी प्रसिद्धीस दिलेली आहे.
Posted inसांगली
महाराष्ट्रामध्ये ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध!
