बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सांगली निवारा भवन येथे सांगली जिल्ह्यातील मोलकरीण महिलांचा भव्य मेळावा
सांगली निवारा भवन येथे बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी ठीक दुपारी एक वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने आश्वासन दिलेले होते की मोलकरीण महिलांना वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा पेन्शन देण्यात येईल. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र अजूनही पेन्शनचा निर्णय महाराष्ट्र शासनाने केलेला नाही. इतकेच नव्हे तर मोलकरीण महिलांच्यासाठी जे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आलेले त्याला सुद्धा पुरेसा निधी महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देत नाहीत याबरोबरच संघटनेच्या वतीने मागणी करीत आहोत की, म्हातारपणाची सोय म्हणून प्रत्येक मोलकरणी महिलेस साठ वर्षे झाल्यानंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळाले पाहिजे. सर्व मोलकरण महिलांना आठवड्यातून एक दिवस पगारी सुट्टी मिळाली पाहिजे. मोलकरीण महिलांच्या कुटुंबीयांना मोफत औषध उपचार मिळाले पाहिजेत. सर्व मोलकरीण महिलांच्यासाठी आरोग्य विमा सुरू झाला पाहिजे. पूर्वीच लागू असलेल्या योजनेनुसार ज्या मोलकर्णी महिलेचे वय 55 वर्षे झालेले आहे त्यांना दहा हजार रुपये सन्मान धन त्वरित मिळाले पाहिजे. मोलकरीण महिलांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे कामाचे तास ठरवून मिळाले पाहिजेत. तसेच मोलकरीण महिलांना किमान वेतन ठरवून मिळाले पाहिजे. या व इतर मागण्यांच्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेले आहे.
या मेळाव्यास महाराष्ट्र घर कामगार मोलकर्णी संघटना अध्यक्ष कॉ शंकर पुजारी मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त मोलकरीण महिलांनी बुधवारी दुपारी एक वाजता उपस्थित राहावे असे आवाहन करणारे पत्रक महाराष्ट्र घर कामगार मोलकर्णी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ सुमन पुजारी यांनी पत्रक प्रसिद्धस दिलेले आहे.
Posted inसांगली
8 फेब्रुवारी रोजी सांगली निवारा भवन येथे सांगली जिल्ह्यातील मोलकरीण महिलांचा भव्य मेळावा
