रमाईचा त्याग, आजच्या महिलांसाठी प्रेरणा – भंतेजी वंगीस
औरंगाबाद
बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या प्रत्येक कार्याला समर्थपणे साथ देणाऱ्या रमाईंचा त्याग सर्व परिचित आहे. त्यांचा त्याग आजच्या महिलांसाठी प्रेरणा असल्याचे प्रतिपादन भंतेजी वंगीस यांनी केले. शिवशंकर कॉलनी येथे आयोजित रमाईंच्या १२५ व्या जंयती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
शिवशंकर कॉलनी येथे रमाईंची १२५ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात बुध्द वंदनेने झाली. जमलेल्या महिलांनी पुष्पहार अर्पन करुन वंदन केले. या प्रसंगी भंतेजी वंगीस यांनी उपस्थिताना रमाईंच्या जिवनावर प्रकाश टाकणाऱ्या काही घटना सांगितल्या. लहानपणीच आई वडीलाचे छत्र हरवलेल्या रमाई संबध आयुष्य धीट पणे जगल्या. बाबासाहेबांनी समाजासाठी नव्हे तर जनतेसाठी केलेल्या प्रत्येक आंदोलनात त्यांची साथ दिली. त्यांच्या कोणत्याच कार्यात त्या आडव्या आल्या नसल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजक अॅड. किरण ढेपे, अमर जाधव, सिध्दार्थ मोकळे, अजय जोगदंडे, मुक्ता ढेपे, संगिता सरदार, इंदूमती जोगदंड, आशिष रोकडे, राहूल सरदार, अखील बलबीर, अशोक काळे, अश्चिनी जोगदंडे, सुरेश मोकळे आदींनी केले.