प्रबोधन वाचनालयास विद्यार्थ्यांची अभ्यासभेट
इचलकरंजी ता.९ इचलकरंजी नगरपालिका शिक्षण मंडळाच्या ‘ भारतमाता विद्या मंदिर क्र.३३ ‘ मधील इयत्ता ५ ते ७ विच्या विद्यार्थी- विद्यार्थिनीनी समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाची पाहणी केली. वाचनालयातील बाल विभागातील तसेच अन्य पुस्तके, वृत्तपत्रे व नियतकालिके,संदर्भ ग्रंथ,पुस्तक देवघेव आदींची पाहणी केली.तसेच पुस्तक हाताळणी व पुस्तक वाचन याचा आनंद घेतला. यावेळी सौदामिनी कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनींना व शिक्षक वृंदाला ग्रंथालयाची माहिती दिली. ग्रंथालयात असलेला समृद्ध बाल विभाग, बाल व युवा वाचकांसाठी असलेली पुस्तके आदी माहिती दिली. तसेच त्यांना वाचनाचे महत्व सांगून शाळे व्यतिरिक्त फावल्या वेळात वाचनालयात वाचनासाठी येण्याचे, तसेच सभासद होऊन पुस्तके घरी वाचायला नेण्याचे आवाहन केले. यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले.तसेच समाजवादी प्रबोधिनीच्या कार्याची माहिती दिली.शिक्षक प्रतिनिधींचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. अश्विनी कोळी यांनी विद्यार्थ्यांना सर्व विभाग दाखविले. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींसह भारतमाता विद्यामंदिर मधील स्वरदा देशपांडे, निलोफर बारगीर, पल्लवी महाजन, स्वाती कोडीलीकर, गौतमी कुंभार, निशा मिरजे, श्रद्धा बरगाले, अफ्रोजा इनामदार,गायकवाड मॅडम,चव्हाण सर, फहीम पाथरवट,प्रतिभा करांडे आधी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. यावेळी निलोफर बारगीर यांनी प्रबोधन वाचनालयाला विद्यार्थ्यांची ही भेट त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आयोजित केली होती. या भेटीतून निश्चितच चांगली माहिती मिळाली तसेच विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची प्रेरणाही मिळाली असे मत व्यक्त करून आभार मानले .