ठरलय ! अर्थसंकल्पीय अधिवेशन चार आठवड्यांचे ,२५ मार्चपर्यंत अधिवेशन

ठरलय ! अर्थसंकल्पीय अधिवेशन चार आठवड्यांचे ,२५ मार्चपर्यंत अधिवेशन

ठरलय ! अर्थसंकल्पीय अधिवेशन चार आठवड्यांचे

२५ मार्चपर्यंत अधिवेशन

रजत डेकाटे प्रतिनिधी

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या २७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून हे अधिवेशन चार आठवडे चालणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी (दि.८) झालेल्या बैठकीत अधिवेशानाचे कामकाज निश्चित करण्यात आले.

अधिवेशन २५ मार्चपर्यंत म्हणजे चार आठवडे चालणार असून राज्याचा सन २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर करण्यात येणार आहे. आजच्या बैठकीत २७ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान होणाऱ्या विधान परिषद आणि विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. अधिवेशनाची सुरुवात २७ फेब्रुवारीला राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी “वंदे मातरम्’ नंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्राचे राज्य गीत वाजविण्यात येणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *