इव्हीएम भांडाफोड राष्ट्रीय परिवर्तन यात्रा आज लातूर शहरात
लातूर : (नवनाथ रेपे) भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाद्वारे काढण्यात येत असलेली इव्हीएम भांडाफोड राष्ट्रीय परिवर्तन यात्रा (टप्पा दूसरा) आज दि. ०६ मार्च २०२३ रोजी लातूर शहरात येत आहे. कन्याकुमारी पासून ते कश्मीर पर्यंत निघालेली दुस-या टप्प्यातील ही इव्हीएम भांडाफोड राष्ट्रीय परिवर्तन यात्रेच्या या कार्यक्रमाचे आयोजन लातूर शहरातील विष्णूदास मंगल कार्यालय, साई नाका अंबाजोगाई रोड लातूर येथे करण्यात आले आहे.
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रमाचे उद्घाटन बहुजन मुक्ती पार्टी लातूर जिल्हाध्यक्ष मा. दत्ताची करंजीकर यांचे हस्ते करण्यात येणार आहे. बहुजन समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. इव्हीएम भांडाफोड राष्ट्रीय परिवर्तन यात्रा ही कन्याकुमारी ते कश्मीर निघाली होती मात्र कोवीड १९ मुळे या यात्रेत व्यत्यय आला होता मात्र आता या यात्रेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रातून सध्या सूरू झाला आहे. महाराष्ट्र ही इव्हीएम भांडाफोड राष्ट्रीय परिवर्तन यात्रा १३ मार्च २०२३ पर्यत सुरू राहणार असून त्यानंतर ही यात्रा काश्मीर कडे जाणार आहे. इव्हीएम विरोधात मा. वामन मेश्राम हे वेळोवेळी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून जनजागृती करत असतात. समाजातील बुद्धीजीवी वर्गाला इव्हीएम मशिन मधून मतांची होणारी चोरी होते हे पुराव्यानिशी मांडून ते लोकशाहीला मारक आहे असे ते आपल्या या इव्हीएम भांडाफोड राष्ट्रीय परिवर्तन यात्रेतून सांगत आहेत. त्यामुळे लोकशाहीला मारक असलेल्या या इव्हीएम विरोधात आवाज उठवण्यासाठी इव्हीएम भांडाफोड राष्ट्रीय परिवर्तन यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ता करंजीकर यांनी केले आहे.