१मे महाराष्ट्र दिन, आणि कामगार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे संजय दादा पाटील, व्याख्याते सुजित कांबळे साहेब, अनिसचे अशोक म्हस्के, उपसरपंच प्रमोद जाधव , यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी योगदानाबद्दल विचार मांडले, महिलांना बालसंगोपन रजा, कामगारांचे संपूर्णपणे हक्क अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुता,लोकशाही, नद्या जोड प्रकल्प , छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक विचार मांडले. समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी नष्ट करून सकल महाराष्ट्र नवनिर्माण व्हावा.तरूणांनी सरकारी नोकरी मिळेल या अपेक्षेने न राहता स्वयं रोजगार, व्यवसाय करून समाजातील स्वभिमान जागृत करावा. कार्यक्रमाचे आयोजन युवराज बनसोडे,प्रस्तवना शंकर लोंढे, आभार मा.उपसरपंच माणिक बनसोडे यांनी मानले.कार्यक्रमासठी सरपंच दिलीप भोसले, सदस्य लक्ष्मण जाधव, पोलिस पाटील सुखदेव जाधव,मा. सरपंच जगुबाई बनसोडे, आणि पंचशिल मित्र मंडळ,व ग्रामस्थ उपस्थित होते.
Posted inसांगली
दहिवडी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा
