शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांना डॉक्टरेट प्रदान तामिळनाडू येथील सालेम- येरकूट येथे शानदार सोहळा ;

शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांना डॉक्टरेट प्रदान तामिळनाडू येथील सालेम- येरकूट येथे शानदार सोहळा ;

शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांना डॉक्टरेट प्रदान

— तामिळनाडू येथील सालेम- येरकूट येथे शानदार सोहळा ;
इंटरनॅशनल यु सी एज्युकेशन कौन्सिल विद्यापीठाकडून गौरव

शिरोळ : प्रतिनिधी
इंटरनॅशनल युसी एज्युकेशन कौन्सिल फ्रान्स विद्यापीठाच्या वतीने शिरोळचे जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दगडू श्रीपती माने यांना सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी
प्रदान करण्यात आली. तामिळनाडू येथील सालेम येरकूट मधील
हॉटेल आराधना – ईन सेव्हन स्टार सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत डी-लिट प्रदान चा शानदार सोहळा झाला. यावेळी विद्यापीठाचे प्रमुख विश्वस्त तसेच मान्यवर उपस्थित होते.
या समारंभात इंटरनॅशनल युसी एज्युकेशन कौन्सिलचे
संस्थापक चेअरमन डॉ एम आय प्रभू, विद्यापीठ कौन्सिल अँम्बीसिटर डॉ समोचिना इलिना यांच्या हस्ते दगडू माने याना सन्मानपूर्वक डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर डॉ गणेश वाईकर, हेल्पिग प्लाम्स फाउंडेशन कर्नाटक डायरेक्टर डॉ कविता कारामिने,
तमिळनाडू एज्युकेशन डिपार्टमेंट सेक्रेटरी
डॉ स्वेता जीवननाथम, तुतीकोरिन
डिस्ट्रिक्ट डायरेक्टर डॉ एम शेथलकुमार आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, या समारंभात सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांना मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिरोळ येथील ज्येष्ठ पत्रकार, रंगकर्मी व सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांनी सर्वसामान्य गोरगरीब, उपेक्षित , निराधार व दिव्यांग घटकासाठी गेली 30 वर्षे आदर्शवत कार्य केले असून लोकसेवेसाठी त्यांनी संघर्ष अनुभवला आहे. त्यानी स्वतःचे आयुष्य खर्ची करून नव्या पिढीला सामाजिक दृष्टी दिली आहे. वडील पिताश्री तथा माजी उपसरपंच स्वर्गीय श्रीपती माने यांच्या सामाजिक व कृषी कार्याचा वारसा घेऊन दगडू माने यांनी श्रीपती माने कृष्णामाई सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे प्रभावी कार्य सुर ठेवले आहे.
महापुराच्या काळात पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी जनजागृती करून प्रशासनाविरोधात आंदोलनात्मक लढ्यात पुढाकार घेतला होता. त्याचबरोबर कोरोना काळात नागरिकांना कोरोना भयमुक्तीसाठी जागृती करीत आवश्यक जीवनावश्यक व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी काम केले . लोकराजा शाहू महाराज यांच्या नावाने 25 वर्षे शाहूू महोत्सव आयोजित करून त्यांनी सामाजिक न्याय तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातून लोककलेचे संवर्धन केले आहे, कोल्हापूर जिल्ह्यात फुले -शाहू – डॉ आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते म्हणून ते परिचित आहेत. यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदे तर्फे आचार्य प्र के अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे. जिल्हा व राज्य पातळीवरील समाजरत्न,लोकनायक, समताभूषण, आदर्श रंगकर्मी, दिव्यांग सेवा गौरव तसेच राष्ट्रीय संघर्षनायक अशा अनेक पुरस्काराने त्यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *