महादेव सनदी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान.
नवे दानवाड:नवे दानवाड येथील रहिवासी व ग्रामीण रुग्णालय दत्तवाड ता.शिरोळ येथील कक्ष सेवक महादेव पुंडलिक सनदी हे २८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले.आटपाडी व दत्तवाड येथील आपल्या सेवा कालावधीत अनेक रुग्णांची इमानेइतबारे सेवा केली.
त्याबद्दल त्यांचा सत्कार शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे मा.चेअरमन -दिलीप शिरढोणे,सहदेव माळी, भालचंद्र खोत,विनायक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. व भावी जीवन आरोग्यमयी व सुखकारक होवो अशा सदिच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी सौ. शशिकला सनदी, कु.कोमल सनदी व कुटुंबिय उपस्थित होते.