पिपल्स रिपब्लिकन पक्षाची पक्ष बांधणीसाठीची बैठक
बैठकीत समोर आल्या अरोप प्रत्यारोपच्या फैरी
नागपूर :- नागपूर येथील पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सीताबर्डी येथील पक्ष मुख्यालयात पक्ष बांधणीसाठी व कार्यकर्त्याचा कार्याचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत अध्यक्ष म्हणून पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे होते.
पिपल्स रिपब्लिकन पार्टी व बाळासाहेबानची शिवसेना (शिंदे गट) यांची युती झाली मात्र पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या काही कार्यकर्त्यांत एकमेकांन विरोधात आरोप प्रत्यारोप सुरू आहे.सहा महिन्यांपूर्वी पुर्व विदर्भ महिला आघाडी अध्यक्ष पदावर सुचिता कोटांगले यांची निवड झाल्याने काही कार्यकर्त्ये नाराज असल्याचे चित्र काल बैठक दिसून आले.
शहर अध्यक्ष कैलास बोंबले म्हणाले की शहरात कार्यक्रम करतात पण शहर अध्यक्ष या नात्याने विचारले जात नाही.
यावेळी बोंबले म्हणाले की शहरात शहर अध्यक्ष व महिला शहर अध्यक्ष यांना विश्वासात घेतले जात नाही. सुचिता कोटांगले यांच्यावर खोचक टीका करताना ते बैठकीत बोलत होते.
यावेळी बोंबले म्हणाले की शहरात शहर अध्यक्ष याला वारंवार अपमानास्पद वागणूक देत असेल तर पदाचा राजीनामा देऊ शकतो. सुचिता कोटांगले यांनी शहरात एक नवीन महिला आघाडी कार्यालयाची मागणी पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी फेटाळून लावली. यावेळी जयदीप कवाडे म्हणाले की सुचिता कोटांगले आल्याने नव चैतन्य आले. शहर अध्यक्ष कैलास बोंबले यांनी पुर्व विदर्भ महिला आघाडी अध्यक्षा सुचिता कोटांगले यांना नागपूर शहर मध्ये
दखल बाजी करु नये असे आढावा बैठकीत बोलले.
प्रतिक्रिया
“आधीच्या दक्षिण पश्चिम विधानसभा अध्यक्ष शहर अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी घाणरड राजकारण केले. मी सरांचा भीमसैनिक आहे आणि प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या सोबत राहणार असी प्रतिक्रिया प्रणय हाडके यांनी दिली.”
प्रणय हाडके