डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या विद्यार्थ्यांचे यूपीएससी, एम पी एस सी मध्ये उज्वल यश
जयसिंगपूर येथील डॉक्टर जे. जे. मगदुम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे श्री निहाल राजश्री प्रमोद कोरे यूपीएससी व श्री नागेश बामणे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
श्री निहाल कोरे यांनी ऑल इंडिया ९२२ वी रँक मिळवून सुयश संपादन केले तर श्री नागेश बामणे हे कक्ष अधिकारी (मंत्रालय राजपात्रित अधिकारी ) म्हणून नियुक्त झाले आहेत.
या दोन्ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे डॉ. जे.जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ.सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांनी अभिनंदन केले व त्यांच्या भावी आयुष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ.जे.जे.मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजचे विविध शाखेतील ३२ हुन अधिक विद्यार्थी आजपर्यंत शासकीय सेवेत रुजू आहेत तथापि या दोन विद्यार्थ्यांच्या यूपीएससी,एमपीएससी मधील निवडीने महाविद्यालयाच्या यशामध्ये भर पडली आहे. महाविद्यालयीन व्यवस्थापन, प्रशासन व प्राध्यापक वर्गाचे मोलाचे सहकार्य, उपलब्ध सुविधा व शिक्षण घेत असताना मिळालेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभदायक ठरले आहे.
अतिशय खडतर परिस्थितीशी सामना करत असताना प्रसंगी जवळचे मित्र सुद्धा दुरावले गेले पण अशा अडचणीच्या वेळी मला जे.जे.मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या ग्रंथालयाचा फार मोठा उपयोग झाला. अभ्यासासाठी लागणारी अभ्यासिका, विविध संदर्भ साहित्य आणि प्राध्यापकाचे मार्गदर्शन हे माझ्या यशाचे गमक आहे असे मी समजतो. भविष्यात महाविद्यालयाने स्वतंत्र स्पर्धापरीक्षा केंद्राची सुरुवात आपल्या कॉलेजमध्ये करावी अशी माझी इच्छा आहे अशा सद्भभावना सत्कार प्रसंगी निहाल कोरे यांनी व्यक्त केल्या.
कोविडच्या काळातही अभ्यासामध्ये सातत्य राखून श्री नागेश बामणे यांनी एमपीएससी मध्ये चौथ्या प्रयत्नात हे यश संपादन केले.
आतापर्यंत त्यांनी एकूण चार स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविले आहे. २०१६ मध्ये बीएसएनएल आणि महाजनको या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण आहे. सध्या नागेश बामणे बीएसएनएल मध्ये पुणे येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. कॉलेजमध्ये असताना अभ्यासक्रमासोबतच व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून अभ्यास व इतर उपक्रमामध्ये भाग घेऊन यश मिळवण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या, विभाग प्रमुख व प्राध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. जे. जे. मगदूम कॉलेजमध्येच नकळतपणे माझी मुलाखतीची तयारी झाली असे मत नागेश बामणे यांनी व्यक्त केले.
Posted inकोल्हापूर
डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या विद्यार्थ्यांचे यूपीएससी, एम पी एस सी मध्ये उज्वल यश
