मुंबईतील विद्यार्थिनी हत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेकडे द्यावा
महिला संघटनेची मुख्यमंत्री व महिला आयोगाकडे मागणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी प्रतिनिधी )-संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या मुंबईतील शासकीय वसतिगृहात विद्यार्थींनीवर झालेल्या अतिप्रसंग व हत्येचा तपास विशेष तपास यंत्रणेमार्फत (ए टी एस) करण्यात येऊन यातील सर्व गुन्हेगारांना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी माऊली बहुउद्देशीय महिला संघटनेने मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि राज्य महिला आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे या प्रकरणातील नाट्यमय घडामोडी पाहता एकापेक्षा अधिक आरोपी यात सहभागी असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने याचा सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी या संघटनेच्या अध्यक्षा उषाताई चौधरी यांनी केली आहे .
मुंबईतील चर्नी रोड येथील सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात राहणा-या अकोला येथीलविद्यार्थिनीवर अतिप्रसंग करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली या हत्येचा संशयित असणारा सदर वसतिगृहाचा सुरक्षा रक्षक यानेही रेल्वेखाली आत्महत्या झाली या सर्व घटना नाट्यमयरित्या वाटत असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे ज्या नाट्यमय घडामोडी घडलेल्या दिसत आहेत त्यावरून या प्रकरणात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही या प्रकरणामुळे शासकीय वसतिगृहांची सुरक्षितता धोक्यात आलेली असून पर्यायाने शासनाची विश्वासार्हताच धोक्यात आली असल्याने यापुढे कोणीही पालक आपल्या मुलींना सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहण्याचा धोका पत्करणार नाही अशी नाराजी चौधरी यांनी व्यक्त केली आहे तसेच सदर दुर्दैवी विद्यार्थीनीच्या कुटुंबियांना २५ ते ५० लाख रूपयांचे आर्थिक सहकार्य करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्य महिला आयोग्गाकडे केली आहे
Posted inमहाराष्ट्र मुंबई
मुंबईतील विद्यार्थिनी हत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेकडे द्यावामहिला संघटनेची मुख्यमंत्री व महिला आयोगाकडे मागणी
