प्रबोधिनीत बुधवारी प्रा.डॉ.रोहन चौधरी यांचे व्याख्यान
इचलकरंजी ता.१२, समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ‘भारताचे परराष्ट्र धोरण : आव्हान व संधी ‘ या महत्त्वाच्या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे व्यासंगी तरुण अभ्यासक प्रा.डॉ.रोहन चौधरी(पुणे) हे प्रमुख वक्ते आहेत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ.भारती पाटील या अध्यक्षस्थानी आहेत. बुधवार ता. १४ जून २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. तरी जिज्ञासू नागरिक बंधू- भगिनींनी यावेळी उपस्थित रहावे. असे जाहीर आवाहन समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.