डॉ जे जे मगदूम आय टी आय सलग तिसऱ्या वर्षी 100% निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाण प्रमाण पत्र इयत्ता बारावी परीक्षेत डॉ. जे जे मगदूम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी समकक्षतेचे क्रेडिट घेऊन उत्तीर्ण झाले आहेत संस्थेचा निकाल 100% लागला आहे परंपरा सलग तिसऱ्या वर्षीही 100 % निकालाची कायम ठेवले आहे सदर प्रशिक्षणार्थ्यांना इयत्ता बारावी एम सी व्ही सी करणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे ज्या शाखेमध्ये उच्च शिक्षण करिता प्रवेश घेता येणार आहे या परीक्षेत प्रथम क्रमांक संदेश खोपकर 69.17% द्वितीय क्रमांक ऋषिकेश मोराडे 65.50% व तृतीय क्रमांक राहुल भोई 62% ने उत्तीर्ण झाले आहेत
2018 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने प्रशिक्षण संस्थेमधील आय आय टी आय व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थीला इयत्ता बारावीची समकक्षता देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. या अनुषंगाने डॉ . जे जे मगदूम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तेरा प्रशिक्षणार्थ्यांकडून राज्य मंडळाकडून मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी इयत्ता बारावी फॉर्म भरण्यात आला होता या परीक्षेमध्ये इयत्ता बारावी परीक्षार्थींना आय टी आय अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेतील चार विषयात ट्रान्सफर ऑफ क्रेडिट देण्यात येणार होते तर भाषा विषयात उत्तीर्ण होणे अनिर्वाय करण्यात आले होते
राज्य मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेतील त्यांच्या या यशाबद्दल डॉ जे जे मगदूम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय मगदूम संस्थेच्या उपाध्यक्षा सौ अँड सोनाली मगदूम संस्थेचे सहसचिव श्री कुलकर्णी पी एच एच व प्राचार्य एस टी पांडव तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केल
शैक्षणिक वर्ष 2023 24 चे अँडमिशन सुरू झाले आहे अधिक माहितीसाठी संस्थेत भेट द्यावी
Posted inकोल्हापूर
डॉ जे जे मगदूम आय टी आय सलग तिसऱ्या वर्षी 100% निकाल
