*
जयसिंगपूर येथील डॉ. जे.जे.मगदूम ट्रस्ट अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. योग गुरु श्री. मोहन जगताप व योग तज्ञ डॉ.संजीवनी हवालदार यांनी उपस्थिततांना दैनंदिन योगासनाचे महत्त्व प्रात्यक्षिकासहित सांगितले.
भारतासह जगभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस साजरा करायला २०१५ पासून सुरुवात झाली २१ जून हा उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्यामुळे आणि जगाच्या अनेक भागांमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे जागतिक योग दिनासाठी ही तारीख निवडण्यात आली. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंबली मध्ये केलेल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव दिला होता या भाषणात मोदीजी म्हणाले होते की योग ही भारताची देणगी असून तो जगभरातील नागरिकाचे आरोग्य सुधारण्यास मदत करेल. त्याचेच अनुकरण म्हणून डॉ. जे.जे. मगदूम होमिओपॅथी मेडिकल कॉलेज कडून गेली दहा वर्ष योगाभ्यास वर्ग योगतज्ञ डॉ. संजीवनी हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जातो. आजच्या कार्यक्रमात डॉ जे जे मगदूम ट्रस्ट अंतर्गत कार्यरत असलेले इंजीनियरिंग कॉलेज, बी.फार्मसी,डी. फार्मसी, नर्सिंग मेडिकल कॉलेज,जयप्रभा इंग्लिश मेडियम स्कूल आणि ज्यू कॉलेज व जयविजय विद्यामंदिर या सर्व शैक्षणिक संस्थांनी भाग घेतला
डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट चेअरमन डॉ. विजय मगदूम व व्हॉइस चेअरपर्सन ॲड.डॉ. सोनाली मगदूम यांनी उपस्थिताना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेडिकल डायरेक्टर डॉ. प्रशांत खाडे यांनी केले तर आभार प्राचार्य सुनील बन्ने यांनी मानले. उपस्थितांमध्ये इंजीनियरिंग कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.सुनील आडमुठे. डायरेक्टर संदीप रायण्णवार यांच्यासह महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. शुभांगी पाटील,डॉ. एस.एस. पाटील, स्मिता पाटील, डॉ.नदाफ व मुख्याध्यापक राहुल नवकुडकर आणि ट्रस्ट अंतर्गत सर्व कार्यरत असलेले शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली . कार्यक्रमाचे आयोजन डॉ. जे.जे. मगदूम आयुर्वेदिक कॉलेजच्या स्वस्थवृत्त विभाग प्रमुख डॉ. संग्राम पाटील व एन. एस. एस. विभाग प्रमुख डॉ मंजुषा देसाई व होमिओपॅथी कॉलेजच्या एन.एस. एस. विभाग प्रमुख डॉ. दधिती जोशी यांनी केले.
Posted inकोल्हापूर
*डॉ.जे.जे. मगदूम ट्रस्ट अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा *
