दत्तवाड येथे छोटा बंधारा बांधावा – सर्व पक्षीयांचे निवेदन.
दत्तवाड येथील दूधगंगा नदी यावर्षी वारंवार कोरडी पडल्यामुळे दतवाड व परिसरातील नऊ गावात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला.
यावर्षी संपूर्ण उन्हाळ्यात वळीव पावसाने ओढ दिल्याने व दुधगंगा नदी वारंवार कोरडी पडल्यामुळे दत्तवाड व परिसरातील गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवली व पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली.
दत्तवाड ग्रामपंचायत ने यासाठी विविध उपयोजना करण्याचा प्रयत्न केला. नदीमध्ये बोरवेल मारून ही प्रयत्न केले .तसेच अनेक लोकांनीही पाण्याची व्यवस्था केली. युवा मित्र व सामाजिक कार्यकर्त्यांनी
15 दिवस टँकरने पाणीपुरवठा केला.
भविष्यात अशी गंभीर परिस्थिती उद्धवू नये
यासाठी दत्तवाड येथे कोटलिंग भागामध्ये छोटा बंधारा बांधून मिळावा
अथवा दत्तवाड एकसंबा बिरनाळ धरणाची उंची वाढवावी या आशयाचे निवेदन माजी राज्यमंत्री विद्यमान आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे दत्तवाड येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज दिले.
यासाठी लवकरच पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक लावून सर्व गोष्टींचा अभ्यास करून दत्तवाड एकसंबा बिरनाळ येथील धरणाची उंची वाढवणे अथवा नवीन छोटा बंधारा बांधणे याविषयी लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन आमदार पाटील यांनी शिष्टमंडळास दिले.
यावेळी दत्तवाडचे सरपंच चंद्रकांत कांबळे सर,
भाजपा तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील ,गुरुदत्त संचालक बबनराव चौगुले, ग्रा प. सदस्य बाबुराव पवार, संजय पाटील,नूर काले ,तंटामुक्त अध्यक्ष सुरेश पाटील, प्रकाश चौगुले, युवराज घोरपडे ,अशोक पाटील, दीपक कांबळे,
बसगोंडा पाटील तोडकर, नटराज माळगे,
राजू केंगारे, व इतर नागरिक उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
दत्तवाड येथे छोटा बंधारा बांधावा – सर्व पक्षीयांचे निवेदन.
