शिवाजी तरुण मंडळ, परिवर्तन फाउंडेशन तर्फे शाहू जयंती उत्साहात साजरी
परिवर्तन फाउंडेशन तर्फे
शाहू जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शाहू पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
कोल्हापूर.दि.२६ (प्रतिनिधी) शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळ व परिवर्तन फाउंडेशन तर्फे शिवाजी मंदिर सभागृहात झालेल्या समारंभात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास श्रीमंत शाहू महाराज,करवीरचे उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी हरीश धार्मिक, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजितभाऊ चव्हाण, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे,करवीरचे वन अधिकारी रमेश कांबळे,बाळूमामा ट्रस्टचे प्रशासक व कोल्हापूर धर्मदाय अधीक्षक शिवराज नायकवडे, कोल्हापूर महानगरपालिकेचे उपशहर अभियंता रमेश कांबळे,प्रा.आनंद भोजणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना परिवर्तनचे शाहू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये डाॅ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. महादेव माने, एक्साइजचे कोल्हापूर जिल्हा भरारी पथक प्रमुख निरीक्षक पी. आर. पाटील, मंथन फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र वराळे, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार करचे, कोल्हापूर महानगरपालिकेचे मुकादम अरुण जमादार, एक्साइजचे जवान राज कोळी, कोल्हापूर परिक्षेत्रीय खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर,साहित्यिक, लेखक, कवी मोहन कांबळे,एक्साईजचे जवान सचिन काळेल, हातकणंगले विभागाचे वनपाल रॉकी देसा आदी मान्यवरांना गौरवण्यात आले.
यावेळी परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे, कार्याध्यक्ष अक्षय साळवे, शहराध्यक्ष राहुल गणेशाचार्य, रोहन कांबळे, बार्टीचे किरण चौगले, राज कुरणे, गोपी कुरणे, शरद कांबळे,शरद नागवेकर आदी उपस्थित होते.