महाराष्ट्रातील नोंदीत 20 लाख बांधकाम कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्यांच्यासाठी 20 जुलै 2023 रोजी आझाद मैदान मुंबई येथे धडक मोर्चा!

महाराष्ट्रातील नोंदीत 20 लाख बांधकाम कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्यांच्यासाठी 20 जुलै 2023 रोजी आझाद मैदान मुंबई येथे धडक मोर्चा!

महाराष्ट्रातील नोंदीत 20 लाख बांधकाम कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्यांच्यासाठी 20 जुलै 2023 रोजी आझाद मैदान मुंबई येथे धडक मोर्चा!
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सध्या उपकरांमधून वीस हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम जमलेली आहे. ही रक्कम बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी वापरण्याबाबत कायद्याअंतर्गत बोर्ड नेमण्यात आलेले आहे. परंतु मागील दोन वर्षापासून या बोर्डवर कामगारांचे प्रतिनिधी व मालकांचे प्रतिनिधीच महाराष्ट्र शासनाने बंधनकारक असूनही अद्याप नेमलेले नाहीत. त्यामुळे अनावश्यक बाबींच्या वर चार हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत.
परंतु ज्या महत्त्वाच्या कामगारांच्या कल्याणकारी योजना आहेत त्याच्यासाठी मात्र अर्ज मंजूर केले जात नाहीत. उदाहरणार्थ ज्या बांधकाम कामगारांचा मृत्यू होतो त्यांच्या वारसांना दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य द्यावे असा या मंडळाने दोन वर्षांपूर्वीच ठराव केलेला आहे परंतु या ठरावाला महाराष्ट्र शासनाने अद्याप मंजुरी दिली नाही.
इतकेच नव्हे तर विधवा महिलांना पतीच्या निधनानंतर अंत्यविधीची दहा हजार रक्कम सुद्धा मिळत नाही अशी स्थिती आहे म्हणूनच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर खऱ्याखोऱ्या कामगार संघटनेचे प्रतिनिधी व मालक प्रतिनिधी यांची नेमणूक करावी ही कामगार संघटनांची प्रमुख मागणी असून अनावश्यक योजनांच्यावर करोडो रुपयांची उधळपट्टी करण्याऐवजी नेमक्या कल्याणकारी योजनेवर रक्कम खर्च करावी या मागणीसाठी 20 जुलै रोजी मुंबई विधानसभेवर मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.
दोन वर्षांपूर्वी बांधकाम कामगार संघटनांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती (रिट पिटीशन क्रमांक १०२७/२०२१) या याचिका मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला असा आदेश दिलेला आहे की दोन वर्षांपूर्वी कामगार मंत्र्यांनी प्रत्येक नोंदीत कामगारांना पाच हजार रुपये बोनस द्यावा अशी घोषणा केली होती. त्याच्याबद्दल निर्णय करावा असे आदेश महाराष्ट्र शासनाला दिलेले आहेत. कामगार संघटनांनी अनेक वेळा मागणी करून सुद्धा या बोनस बाबत महाराष्ट्र शासन निर्णय जाहीर करण्यास तयार नाही.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत दोन हजार रुपये घरकुलासाठी अनुदान देण्याची तरतूद आहे.परंतु अगदी ग्रामीण भागात सुद्धा दोन लाखांमध्ये घर होत नाही त्यासाठी कामगार संघटनांनी मागणी केलेली आहे की किमान पाच लाख रुपये घर बांधण्यासाठी अनुदान द्यावे. प्रत्यक्षात मात्र दोन लाख रुपये सुद्धा अनुदान मागणी केलेल्या नोंदीत बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाकडून मंजूर केले जात नाहीत.
दुसऱ्या बाजूस कामगार मंत्र्यांनी मात्र जाहीर केलेले आहे की सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना आम्ही घरे देणार आहोत. प्रत्यक्षात 100 कामगारांना सुद्धा अद्याप घरांच्यासाठी अनुदान मिळालेले नाही. या सर्व अन्यायाविरुद्ध मुंबई विधानसभेवर मोर्चा काढण्याचा निर्णय बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या 25 जून रोजी झालेल्या जून मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे.
२५ जून मीटिंगमध्ये कॉम्रेड शंकर पुजारी ,कॉ सुनील पाटील, कॉ रमेश जाधव, कॉ विशाल बडवे, कॉ संतोष बेलदार, प्रा. शरयू बडवे,कॉम्रेड रोहिणी कांबळे, विनिता बालेकुंद्री इत्यादींचा समावेश होता.
२० जुलै २०२३ मुंबई विधानसभेवरच्या मोर्चासाठी सांगली मधून किमान दोन हजार कामगार जाण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे.
मुंबई मोर्चाच्या तयारीसाठी पहिली बैठक सांगली निवारा भवन येथे 27 जून रोजी ठीक दुपारी अकरा वाजता घेण्यात आली या बैठकीमध्ये २० जुलै ची जोरदार तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये कॉ विशाल बडवे, आयु.दादासाहेब वाघमारे, आयु.धनंजय वाघमारे, विद्या भोरे, सोनाली चव्हाण, सलीम इनामदार, हरी पाटील, विनोद पानबुडे, अजित खटावकर, राजेंद्र साळुंखे, शाबिरा शेरकर, अनिशा शेख व रोहिणी खोत इत्यादींनी बैठकीमध्ये महत्त्वाच्या सूचना मांडल्या.
२० जुलै 2023 रोजी मुंबई मोर्चासाठी महाराष्ट्र मधून किमान दहा हजार मुंबईस कामगार येतील अशी तयारी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांच्या नेत्यांनी प्रतिनिधींनी करावी असे आवाहन करणारे पत्र निवारा बांधकाम कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी प्राध्यापिका शरयू बडवे व सचिव कॉ विशाल बडवे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिलेली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *