गायरान व शासकीय पड जमिनीवरील अतिक्रमण केलेली घरे नियमाकुल करण्याच्या अर्जाची प्रक्रिया करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी शिष्टमंडळास दिले.
पंधरा दिवसांपूर्वी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वायफळे व आरग आणि इतर गावातील बांधकाम कामगारांनी गायरान व सरकारी पड जमिनीमधील मधील स्वतःची घरे नियमाकुल करावीत असा 67अर्ज नोंदवलेले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 51 नुसार अतिक्रमण करण्यात आलेली घरकुले नियमित करण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे. सांगली जिल्ह्यात ही प्रक्रिया राबविण्याचे ठोस आश्वासन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी बांधकाम कामगार संघटनेच्या शिष्टमंडळास दिले.
शिष्टमंडळाच्या वतीने बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी असेही सांगितले की, तारीख दोन ऑगस्ट 2018 रोजी महाराष्ट्र शासनाने केलेल्या जीआर नुसार ज्या नागरिकांनी शासनाच्या कोणत्याही योजनेनुसार घरे मिळण्यासाठी अर्ज केलेला असल्यास आणि जर त्यांच्याकडे घर बांधण्यासाठी जमीन नसल्यास त्यांना घर बांधण्यासाठी विनामूल्य जमीन देण्यात येईल.
त्यानुसार सध्या सांगली सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये 200 पेक्षा जास्त नोंदीत बांधकाम कामगारांनी घरांचे अनुदान मिळण्यासाठी अर्ज केलेले आहेत. त्यापैकी ज्यांना घर बांधण्यासाठी जमीन नाही त्यांना जमीन मिळावी अशी मागणी करण्यात आली. याबाबत ही शासन जीआर नुसार सत्वर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळास डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिलेले आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या या आश्वासनाचे निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलेले. आहे. शिष्टमंडळामध्ये कॉमेडी संकट पुजारी कॉम्रेड वैभव बडवे कॉमेडी रंजीत लोंढे व कॉ माया जावीर यांचा समावेश होता.
तसेच महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांना असे आवाहन करण्यात येत आहे की जे नोंदीत बांधकाम कामगार असतील त्यांना स्वतःचे घर बांधायचे असल्यास आणि घर बांधण्यासाठी जमीन नसल्यास तशी जमीन शासनाकडून शासनाच्या मालकीची विनामूल्य मिळण्यासाठी अर्ज करावेत.
तसेच गावठाण व शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेली ज्यांची घरे असतील त्यांना जर नोटीस आलेल्या असतील तर त्या नोटीसला सुद्धा त्यांनी सत्वर उत्तरे देऊन महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याअंतर्गत घरे नियमित करण्यासाठी अर्ज करावेत.
याबाबत सर्व कायदेशीर सल्ला निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने देण्यात येईल. म्हणून राज्यातील सर्व नोंदीत बांधकाम कामगारांनी निवारा बांधकाम कामगार संघटनेबरोबर संपर्क करावा. असे आवाहन महाराष्ट्र निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी यांनी केलं असून तसे पत्रक प्रसिद्धस दिलेले आहे.
तसेच वरील मागणी बरोबरच बांधकाम कामगारांच्या इतर महत्त्वाच्या मागण्यासाठी 20 जुलै 2023 रोजी मुंबई आझाद मैदानावर महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्या आंदोलनामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने भागीदारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Posted inसांगली
गायरान व शासकीय पड जमिनीवरील अतिक्रमण केलेली घरे नियमाकुल करण्याच्या अर्जाची प्रक्रिया करण्यात येईल जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांचे आश्वासन
