निधी वाचून सत्ता गेली.
निधीमुळे मती गेली.
घड्याळ्याच्या अचूकवेळाने दादांनी “अर्थ”साधला
(राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष बातमीपत्र)
महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळाची बैठक आज पार झाली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. आणि एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार आपल्या सहकारी आमदारांसह शिंदे फडणीस सरकारला जाऊन भेटले आणि पुन्हा एकदा नव्याने शपथविधी पार पडला. रविवारी दुपारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर फक्त खातेवाटप बाकी होते आज आज मंगळवारी नेहमीप्रमाणे मंत्रिमंडळ बैठक पार पडली परंतु या बैठकीमध्ये नंतर सुद्धा खातेवाटप जाहीर झाले नाही. खाते वाटपावरून मोठा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे शिंदे फडणवीस गटामधील शिंदे गटाला महत्त्वाची खाती देण्यात आली होती त्या खात्यावरती आता संक्रांत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
राज्यातील महत्त्वाचे खाते म्हणजे अर्थ खाते हे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते व महाराष्ट्राचे नव्याने नियुक्त झालेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या शिवसेना गटात खळबळ निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या चालीमुळे शिवसेना गटामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. शिवसेना गट जो निर्माण झाला त्या गटामध्ये राष्ट्रवादीबरोबर काम करण्याची अस्वस्थता आहे. याचे कारण म्हणजे निधी वाटपामध्ये अजित पवार यांनी केलेला भेदभाव.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून बाहेर पडत असतानाच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार निधी वाटपामध्ये समानता ठेवत नाही व आपल्या गटातील म्हणजे उद्या बाळासाहेब ठाकरेंच्या गटावर अन्याय करत आहे अशी आरोही ठोकून त्यांनी उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली असा एक मतप्रवाह होता आता त्याच राष्ट्रवादी बरोबर मांडीला मांडी लावून बसण्याची पाळी आली आहे. अजितदादा पवार यांच्या प्रवेशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आपल्या शिवसेना गटामधील आमदारांना मंत्री पद देताना फार मोठी तडजोड करावी लागणार आहे. देश पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही व देशहितासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एकसंघ झाला पाहिजे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे. राज्यातील अर्थ खाते अजितदादा पवार यांच्याकडे जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे यामुळे पुन्हा एकदा नव्याने निधी मंजूर करताना सर्वच आमदारांना अजितदादांची मर्जी राखावी लागणार आहे. भाकरी परताना अजितदादांनी तवा व पिठासह देवेंद्राकडें गेल्याने मंत्रीपदाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शिवसेना आमदारांची आपलेच दात व आपलेच ओठ अशी अवस्था झाली आहे.
निधी वाचून सत्ता गेली.
निधी वाचून मती गेली.
निधी वाचून “अर्थ” नाही.
राजकारणातील दादांच्या घड्याळाने अचूक वेळ साधली. उपमुख्यमंत्रीपंदांसह अर्थातच निधीही आपल्याकंडे आणली. आता फक्त शिक्कामोर्तब व्हायचे आहे गतीमान सरकार म्हणून महाराष्ट्रातील राजकारणातील चिखलात कमळ फुलवायचे आहे.