सिव्हिल विभागाच्या आठ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत अभिनंदनिय निवड : जे.जे. मगदूम इंजिनिअरिंगचे यश
जयसिंगपूर येथील डॉ.जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील सिव्हिल विभागाच्या आठ विद्यार्थ्यांची भूमी अभिलेखा गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र या शासकीय सेवेत निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी दिली.
शासकीय सेवेचे मनस्वी ध्येय ठेवून प्रवेशापासून अंतिम वर्षापर्यंत या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या उपलब्ध साधन सामग्रीचा, वाचन साहित्यांचा लाभ घेऊन अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले आहे. श्रद्धा स्वामी, मानसी सारंग, मयूर झुंजारे, धनाजी सातपुते, अश्विनी बेतम, शितल भारती, मिकाज सुतार, ऋतुजा भगत या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन डॉ.जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व्हॉइस चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम यांनी केले.
शासकीय सेवेत आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांकरता महाविद्यालयाकडून एक स्वतंत्र कक्ष कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षा साठी लागणारे अद्यावत वाचन साहित्य, योग्य वेळी मार्गदर्शन व शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचे काम हा कक्ष करत असतो असे प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील
यांनी सांगितले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे डीन डॉ. डी. बी. देसाई, स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख, विभाग प्रमुख डॉ. जे. एस लंबे आणि सिव्हिल विभागाच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
Posted inकोल्हापूर
सिव्हिल विभागाच्या आठ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत अभिनंदनिय निवड : जे.जे. मगदूम इंजिनिअरिंगचे यश
