बनावट श्रद्धेचा
प्रवास
श्रद्धा आणि भारतीय ही एक निरंतर न सोडता येणारेकोडे आहे. श्रद्धा भिन्न भिन्न असू शकते श्रद्धेची व्याख्या ही सापेक्ष असते .श्रद्धा आणि धर्म यांचा फरक न करणारे भारतीय हा एक श्रद्धेचा निरक्षरपणा बाळगून पुढे चाललेला प्रवास आहे. श्रद्धा कर्मादिष्टित धर्माधिष्ठित असलीच पाहिजे असा गृहीत वर्तनवाद इतरांच्या बाबत तयार करणारे भारतीय हा एक मोठा श्रद्धेच्या इतिहासातील खडतर प्रवास आहे. श्रद्धा ही प्रतीकातून विचारातून संस्कारातून पुढे चालते श्रद्धेचे हे पारंपरिक वर्तन खूप गुंतागुंतीच आहे .विवेक वापरून आभावाने श्रद्धेची निवड भारतीय लोक करतात.त्यामुळे श्रद्धेची गुंतागुंत बाळगून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जीवन जगणारे भारतीय यांच्या श्रद्धा आणि वर्तमान श्रद्धां आणि राजकारण श्रद्धा आणि संस्कृती स्वयं श्रद्धा आणि भिन्न धर्मीयसंस्कृती वैयक्तिकश्रद्धा आणि राष्ट्रीय अधिकृत श्रद्धा यामधील अनेक परस्पर संबंध असलेल्या श्रद्धां आणि राष्ट्रीयत्व या सर्व वर्तनप्रक्रियेमध्ये
नको इतकी सरमिसळ सद्या होत आहे तसाच प्रवास प्रत्येक जण करीत पुढे चालत आहे.असा भारतीय समाज हा धर्माचे दृष्टिकोन प्रदूषित करत आहे. धर्म ही स्वच्छ दृष्टी धर्म ही आचरण सिद्धता धर्मही अहिंसा ( अनेक मूल्य)धर्मही श्रद्धेची व्यक्तिगत सर्वोच्च अनुभूती हे सर्व श्रद्धेचे वैयक्तिक स्वायत्त पण नष्ट करून श्रद्धेला सामूहिकता प्राप्त करून देणार आहे. हिंदुत्ववाद हा या देशाला हायब्रीड हिंदुत्वाकडे घेऊन निघाला आहे.
हायब्रीड हिंदुत्व ही विषमता वर्णव्यवस्था भिन्न संस्कृतींना दुय्यम स्थान देऊन तयार करण्यात येत असलेली नवी हायब्रीड हिंदुत्व ही एक श्रद्धा तयार करण्यात आली आहे.
हायब्रीड हिंदुत्व आणि श्रद्धा या दोन्हीही भारतीय वर्तमानात गत 22 जानेवारीपासून फार गुंतागुंतीच्या आणि धूसर बनलेल्या आहेत श्रद्धेला शत्रू बनवता येते. श्रद्धेला परधर्मीयांच्या विरुद्ध चेतावता येते श्रद्धेला अनियंत्रित बनवता येते श्रद्धा व्यवस्था विरोधी उभी करता येते ही अनधिकृत श्रद्धा ही अधिकृत राष्ट्रीय श्रद्धा स्वातंत्र्याच्या विरोधात तयार करण्यात आलेलीराजकीय नीती आहे.
सर्वांच्या श्रद्धेचे सपाटीकरण ही एक सारखी श्रद्धा बनवणे हा हायब्रीड हिंदुत्वाचा प्रवास आहे यामधून श्रद्धेचे भिन्न स्वातंत्र्य नाकारणे भिन्न धार्मिकता नाकारणे भिन्न धर्मीय श्रद्धा नाकारणे भिन्न सांस्कृतिकता कमी लेखणे आणि वसाहतवादाच्या विरुद्धचा एक असंतोष सपाटी करण्याच्या श्रद्धेतून तयार करणे हे एक मोठे कटकारस्थान आहे .यामध्ये हायब्रीड हिंदुत्वात घटनात्मक श्रद्धा स्वातंत्र्य नाकारले जातेच पण त्याहून श्रद्धा स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार हा सुद्धा नष्ट केला जातो यातूनच श्रद्धेचे सपाटीकरण श्रद्धेचा एकसुरीपणा हा तयार करून हिंदुत्वाची हायब्रीड श्रद्धा रुजवण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. हायब्रीड हिंदुत्व हे कर्मकांडी दर्शनीय प्रदर्शनीय व शक्ती प्रदर्शनीय असे स्वरूप धारण करत आहे. धर्मातील अध्यात्मिकता धर्मातील आत्मशोध धर्मातील मूल्य आचरण ही सर्व पायाभूत धर्मकार्य दुर्लक्षित करून देऊळ मूर्ती झेंडे घोषणा हा बहुसंख्यांक श्रद्धा वंतांचा हायब्रीड हिंदुत्वाद मोठ्या वेगाने वाढतो आहे आणि हा हिंदुत्वाचा इतरांच्या धर्म वर्तनाची अधिकृतता तो ठरवू लागला आहे.
हायब्रीड हिंदुत्वाला प्रसिद्धी मिळते आहे. ती राजकीय आश्रयाने मोठी होते .ती मुख्य प्रमुख श्रद्धा मानण्यास भाग पाडण्यात येत आहे. राजकारण आणि हायब्रीड हिंदुत्व श्रद्धा हे नव्हे वसाहतवादाच्या विरुद्धचे तयार केलेले राजकीय स्वयं लाभाचे हत्यार असून यातून इतर धर्मीयांना बेदखल करणे हे वेगाने केले जाणार आहे. देशातील वंचित दलित मुस्लिम अनेकधर्मातील व जातीतील गरीब या सर्व घटकांना बेदखल करणे. हे हायब्रीड हिंदुत्वाचे राजकारण असून ते भारतीयांना देवळे प्राणप्रतिष्ठा घोषणा यामुळे लवकर समजणार नाही यात खूप कालखंड जाणार आहे .भारतीय इतिहास हा असाच हायब्रीड श्रद्धांचां इतिहासम्हणून पुढे आला आहे.इतिहास काळा पासून भारतीयांच्या सरसकट श्रद्धेला बदलत्या वास्तवाच स्वरूप देण्याचा प्रयत्न प्रत्येक संप्रदायवादी करत आलेले आहेत.
आणि यातून ही वास्तवाची राष्ट्रीय श्रद्धा ही निर्माण होताना व परिपूर्ण होताना दिसत नाही यासाठी नैतिकतेचा राष्ट्रीय पाया हा स्वातंत्र्य चळवळीतून सांची विरास त जो पुढेआलेला आहे तो उध्वस्त व नष्ट करणे .हायब्रीड हिंदुत्वाचे नव उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. नैतिक राष्ट्रीय श्रद्धा उध्वस्त करून बनावट हिंदुत्व श्रद्धा भारतीयांच्या हिंदुत्वाचा अजेंडा असून त्या दिशेने भारतीय निघाले आहेत. राष्ट्रीय घटनात्मक श्रद्धेची मूल्य ही विसरणे कृत्रिम पद्धतीने पुढे केलेली वसाहतवादाची धर्म संकटाची कारणे दाखवून भारतीयांच्या श्रद्धेला विषयांतर दिशांतर केले जात आहे आणि हे जर असेच चालू राहिले तर धार्मिक सत्यता आणि धार्मिक बनावट श्रद्धा यांचा एक मोठा संघर्ष पुढील काळात होण्याची संभाव्य शक्यता जास्त आहे धार्मिक सत्यता ही पायाभूत ऐतिहासिक जरी असली तरी त्यात सत्याचा वर्तनाचा आग्रह आणि सामूहिकतेचे भान आहे त्यात श्रद्धा स्वातंत्र्यालामुभा आहे.
मुळात श्रद्धेच्या इतिहासाला पाया नाही श्रद्धेला धार्मिक गटांनी पंथांनी संप्रदायांनी निश्चित ता प्राप्त करून दिली नाही यातूनच बनावट श्रद्धेच्या दिशेने भारतीयांचा प्रवास सुरू झालेला आहे बनावट श्रद्धा ही राजकीय प्रेरित श्रद्धा असते बनावट श्रद्धा ही इतर धर्म बांधवांचे विरोधी वर्तनाला कारणीभूत ठरते श्रद्धेमध्ये वस्तू व्यक्ती जग यांचा मानवी अस्तित्वाशी काही संबंध आहे का याच्या शोधाचा विचार असत नाही बनावट श्रद्धा ही दिखावू उन्मादीअसते. बनावट श्रद्धेला ईश्वराचे अस्तित्व याचेही वेड असत नाही बनावट श्रद्धा ही मूल्य शोधाकडे जात नाही .बनावट श्रद्धा ही वर्तनाचा आग्रह धरत नाही. बनावट श्रद्धा ही स्वयंप्रसिद्धीत राहू इच्छिते समाज मनाची इच्छाअसोअगर नसो ती आम्हीच सच्चे श्रद्धावान आहोत असा आग्रह प्रस्थापित करते आणि त्यातूनचहायब्रीड हिंदुत्वाची व्यक्ती व्यक्ती वर्तनाची झुंड तयार होते हे प्रमाण आता श्रद्धेची साक्षरता न वाढवल्यामुळेअसेच पुढे जाणार आहे. भारतीयांच्या अध्यात्मिक जीवनातला प्रवास नैतिक पायावर उभा न राहता स्व व कारण शोधाकडे जाता चालू जाहला आहे हे सर्व काळात होतेच पण हाब्रिड हिंदुत्व काळा त वेगवान होइल त्यामुळे धर्मश्रद्धा ही लवचिकता सैलपणा हे सर्व श्रद्धेच्या उपासनेमध्ये असलेले स्वातंत्र्य हे नष्ट होणार आणि कट्टरता हीच श्रद्धा पुढील काळात तयार होणार अशी बाकीचे वर्तवता येतात भारतीय धर्माकडे श्रद्धेची आचरण लवचिकता असं जेव्हा प्रगल्भ अर्थ स्वीकारतील तेव्हा हायब्रीड हिंदुत्व हे क्षीण होईल अन्यथा बनावट श्रद्धा येणारी कट्टरता हा हायब्रीड हिंदुत्वाचाप्रवास करण्यामध्ये देशीय बांधव धन्यता मानत राहतील तर धर्मही बहुदृष्टिकोनाची श्रद्धेय नैतिक आचरणाची व्यापक गोष्ट आहे. हे भान कायमपणे भारतीय जनभूमीवरून नाहीसे होईल आणि हायब्रीड हिंदुत्वाचा प्रवास बनावट श्रद्धेच्या कट्टर वादातून वेगाने होऊ लागेल हे होऊ द्यायचे नसेल तर धर्माची मूल्य आचरणशीलता आध्यात्मिक जीवनातील अनुभूती हा धर्माचा पाया प्रत्येक नागरिकाला जो घटनात्मक अधिकार मिळाला आहे त्यानुसार वर्तन करण्याची जीमुभा आहे तीचनष्ट होइल तर भारतात हायब्रीड हिंदुत्व हे प्रस्थापित होईल आणि बनावट श्रद्धेचे धर्माचे नवे दृष्ठी कोन भारतीय धर्म निरपेक्षता मुल्यास अस्थिर. करतील हे होवू नये यांची दक्षता प्रत्येक जण 75 व्या वर्षाकडे निघालेला प्रजास्ताक दिनानिमित्त घेतील हे च प्रजासत्ताक दिनाचे सलामी चे कर्तव्य होय.
शिवाजी राऊत
सातारा दिनाक 26 जाने 24
वेळ 10.20