गुडाळमध्ये झाडावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू!
गुडाळ प्रतिनिधी/ संभाजी कांबळे
राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील गोरखनाथ शामराव पाटील (वय 61) या शेतकऱ्याचा झाडावरून पडल्यानं जागीच मृत्यू झाला. गोरखनाथ पाटील हे शनिवारी सकाळी बांधावरील झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वरचा मळा नावाच्या शेतात पत्नीसह गेले होते.
दुपारी दीडच्या सुमारास फांदी तोडताना उंच झाडावरून तोल जाऊन ते खाली कोसळले. त्यांच्या पत्नीने आरडा ओरडा करताच आसपास असलेल्या शेतकऱ्यांनी गोरखनाथ यांना तातडीने कसबा तारळे येथे रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर गुडाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पाश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे जवान उत्तम पाटील यांचे ते वडील होत.