सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या.धनंजय चंद्रचूड यांचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले अभिनंदन

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या.धनंजय चंद्रचूड यांचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले अभिनंदन

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या.धनंजय चंद्रचूड यांचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले अभिनंदन

मुंबई दि.28 – सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारल्या बद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मूख्य न्यायाधीश न्या.धनंजय चंद्रचूड यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. सर्वोच्च न्यायालय प्रांगणात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावा ही कल्पना कशी सुचली याची माहिती या भेटीत मूख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी ना.रामदास आठवले यांना दिली.

एका मासिकात गाऊन घातलेला वकिलाच्या पोशाखातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपण पाहिला. त्याक्षणी मनाला वाटले की सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात असाच गाऊन घातलेला वकिलाच्या पोशाखातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला पाहिजे.
सर्व क्षेत्रा प्रमाणे न्याय आणि विधी क्षेत्राला कायदेपंडित; विधिज्ञ; विद्वान; ज्ञानसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श प्रेरणा लाभते. त्यांचा कायदा विधीशी जवळचा संबंध; संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान देश घडविण्यात मोठे आहे.त्यांच्या सारख्या महामानवाचा पुतळा उभारला पहिजे असे मला वाटले आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वकिलाच्या पोशाखातील पुतळा उभारण्यात आला. दरवर्षी 14 एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती ला आम्ही सर्वोच्च न्यायालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत होतो. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावा ही ईच्छा होती ती पूर्ण झाल्याची माहिती मुख्य न्यायाधीश न्या.धनंजय चंद्रचूड यांनी दिली. सर्वोच्च न्यायालय प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारून ऐतिहसिक काम केल्या बद्दल केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या.धनंजय चंद्रचूड यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

ना.रामदास आठवले यांनी सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिएशनला भेट दिली तेंव्हा सर्व वकिलांनी ना.रामदास आठवले यांचे स्वागत केले. वकिलांना मेडिक्लेम मिळण्यास अडचणी येतात ते मिळवून द्यावे तसेच सर्वोच्च न्यायालयात 15 हजार वकील आहेत.त्या पैकी केवळ 1 ते दीड हजार लोकांना ऑफिस मिळते. त्यामुळे येथे अधिक कार्यलयांची इमारत बांधून अधिक प्रमाणात वकिलांना ऑफिस मिळवून देण्याची मागणी वकिलांनी ना.रामदास आठवले यांच्या कडे केली.त्यावर आपण नक्की केंद्र सरकार द्वारे मदत करू असे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी वकिलांना दिले.
त्यानंतर सर्व वकिलांसोबत ना.रामदास आठवले यांनी सर्वोच्च न्यायालय प्रांगणात उभारण्यात आलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाहून विनम्र अभिवादन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *