डॉ. आर.बी जाधव सर म्हणजे गोर-गरिबांचा जीवनदाता!!!!
डॉ.आर.बी जाधव सरांच्या कडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने अमिताभ बच्चनजी यांच्या मृत्यूदाता सिनेमाची पूर्ण स्क्रिप्ट डोळ्यासमोर उभी राहते.खरोखरच मृत्युदाता सिनेमातले अभिताभ बच्चन ज्याप्रमाणे आहेत.त्याप्रमाणे कुरुंदवाडच नाही तर परिसरातील गोरगरीब नागरिकांचे डॉ.आर.बी जाधव सर हे बच्चनच आहेत.
एखाद्या रुग्णांचा जीव परत आणण्यासाठी,डॉक्टरांना परमेश्वराच्या न्यायालयात झगडून ते आपला जीव परत आणतात.म्ह्णून आपण आपल्या जीवन दात्याला डॉक्टर म्हणतो,जो आपल्याला जन्म देतो, तसेच कधीकधी आपल्याला मृत्यूपासून वाचवितो.डॉक्टर सर्वात धोकादायक रोगसुद्धा बरा करू शकतो. विज्ञानाच्या चमत्कारांच्या मदतीने आज डॉक्टरांनी वर्चस्व सिद्ध केलं आहे.
जगात डॉक्टरांचा खूप आदर केला जातो, भारतात सुद्धा त्यांची पूजा केली जाते. तसे, कोणत्याही मनुष्याची तुलना देवाशी कारणे योग्य नाही, परंतु डॉक्टरांनी आपल्या कामाद्वारे ही पदवी प्राप्त केली आहे.हे कार्य करत असताना सामाजिक भान जपून गोर-गरिबांच्या झालेल्या आजारासाठी धडपडणारा कोणताही अर्थ न शोधणारा एक अवलिया कुरुंदवाड शहरात जन्माला आला. तो अवलिया म्हणजे डॉ.आर.बी जाधव सर त्यांना एका पत्रकार संघाने पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला त्यांच्याबद्दल थोडंस…..
आज कोठेही वैद्यकीय क्षेत्रात गरीब माणसाला कुठली वैद्यकीय गरज असेल तर प्रत्येकाच्या तोंडी फक्त एक च नाव येते “ते आपले डॉ.जाधव सरांच्यासकडे को चला” कधीही कुठेही अपरात्री कॉल करा डॉ.आर.बी जाधव सर कायम हजर असतात,, नेकी कर दरिया में दाल ह्या तत्वा प्रमाणे वागणारे,त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो गरीब,वृद्ध,माता,विधवा भगिनी ची सेवा करणारे आमचे मार्गदर्शक डॉ.आर.बी जाधव सरांच्याकडे पाहिलं तर परमेश्वराने खरोखर या पृथ्वीस्थळावर “फरीशता”पाठवला आहे असे वाटते.
नुसताच उच्च शिक्षित असुन काही उपयोग नाही. सोबत सामाजिक भान असणे खुप महत्वाचे असते. आपल्या शिक्षणाचा सदुपयोग झाले पाहिजे. ज्ञान दिल्याने वाढत राहते त्याला अडवून ठेवणे म्हणजे संकुचित प्रवृत्ती जोपासणे. ह्या विचारांनी कधी कधी मी खूप विचारधिन होऊन जातो. आपण या समाजाचे काही देणे लागतो. आपण ही सामाजिक जबाबदारी म्हणुन शक्य त्या त्या ठिकाणी उपलब्ध राहुन आपली उपस्थिती दर्शवले पाहिजे आणि हेच खऱ्या अर्थाने सुशिक्षित, सु-संस्कारीक असल्याचा दाखला असेल…! आणि हे ज्ञान कोणत्या विद्यापीठातून नाही तर मला डॉ.आर.बी जाधव सरांच्या गोर-गरिबांच्या प्रति असलेल्या प्रेमातून आणि त्यांच्या कार्यातून मी शिकलो आहे.
खरे तर डॉ.आर.बी जाधव सर हे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील आमचे मार्गदर्शक पणं माझ्या साठी मोठ्या भावाप्रमाणे आहेत. आजपर्यंत ज्या रुग्णांसाठी मी हॉस्पिटलमध्ये गेलो त्या त्यावेळी सरांनी डोळ्यात अश्रू येण्यासारखं कार्य केलं…..
डॉ.आर.बी जाधव सर माझे मित्र असल्याने आमच्या कुटुंबाच्या नव्हे सर्वसामान्य गोर-गरिबांच्या वैद्यकीय संकट काळी बाहेर पडण्याचा मार्ग आहेत!!!!
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांना खूप खूप अभिनंदन!!!!!!!!!!!!!
जमिर पठाण पत्रकार कुरुंदवाड